Yantra India Limited Recruitment 2023: 10+ITI झालाय? लगेच ‘असा’ करा अर्ज! तब्बल 5395 जागांची निघालीय मेगा भरती..
Yantra India Limited Recruitment 2023: बेरोजगारी (unemployment) दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी आता काही विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होत आहे. बेरोजगारी बरोबर महागाई (inflation) देखील वाढत चालली असल्याने, आता कुठेतरी चार पैशाची नोकरी असणे देखील महत्वाचे आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरीची कोणतीही शास्वती राहिली नसल्याने, अनेकजण दहावी बारावीनंतर कमी पगाराची नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात. जर तुमची देखील दहावी झालेली असेल, आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला नोकरी करण्याची मोठी संधी आहे.
यंत्र इंडिया लिमिटेड या (Yantra India Limited) विभागामध्ये तब्बल 5395 जागांची भरती केली जाणार असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना 14 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जाणून घेऊया उमेदवारांची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता काय आहे? ऑनलाईन कसा करायचा. (Yantra India Limited Nagpur Bharti)
पदानुसार जागा आणि शैक्षणिक पात्रता
यंत्र इंडिया लिमिटेड या विभागात एकूण 5395 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आता आपण पदानुसार जागांचं वर्गीकरण कसं करण्यात आलं आहे, हे सविस्तर जाणून घेऊ. आयटीआय, Non- ITI या पदासाठी एकूण 1 हजार 887 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा मग समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.
आयटीआय, Ex- ITI या पदासाठी एकूण 3 हजार 508 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता NCVT किंवा SCVT अंतर्गत कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थे म्हणून ट्रेन चाचणी 50 गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळामधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
यंत्र इंडिया लिमिटेड या विभागामध्ये नोकरी करायचे असेल तर काही वयोमर्यादेची देखील अट घालण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 या दरम्यान असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एससी/एसटी या प्रवर्गातून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला पाच वर्षाच्या अतिरिक्त सूट मिळणार आहे. जर तुम्ही ओबीसी या प्रवर्गातून अर्ज करणार असाल, तर तीन वर्षाची अतिरिक्त सूट मिळणार आहे.
परीक्षा फी/ नोकरीचे ठिकाण
यंत्र इंडिया लिमिटेड या विभागामध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला काही अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. जर तुम्ही ओपन आणि ओबीसी प्रवर्गातून अर्ज करणार असाल तर तुम्हाला 200 रुपये रुपये शुल्क आकारले जाणार आहे. SC/ST त्याचबरोबर PWD, Transgender आणि महिला उमेदवारांसाठी 100 रुपये परीक्षा फी आकारली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.
पगार आणि निवड प्रक्रिया
यंत्र इंडिया लिमिटेड या विभागामध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा 6 हजार ते 7 हजार रुपये वेतन मिळणार आहे. यंत्र इंडिया लिमिटेड या विभागामध्ये उमेदवारांची निवड निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा झाल्यानंतर मेरिट लिस्टच्या आधारे निवड होणार आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
यंत्र इंडिया लिमिटेड या विभागामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.yantraindia.co.in/home.php असं सर्च करायचं आहे. तुम्हाला ही डायरेक्ट अर्ज करण्याची लिंक देण्यात आली आहे. जर तुम्हाला भरतीची जाहिरात पाहायची असेल तर यावर क्लिक करा अधिकृत संकेतस्थळ: www.yantraindia.co.in
हे देखील वाचा My11Circle prediction: My11Circle वर टीम बनवताय? जिंकायचं असेल, तर या पाच गोष्टी विचारात घेऊनच बनवा टीम..
Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..
CSK vs RR: या सिझनचे दोन सर्वात तगडे संघ एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कोण मारणार बाजी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम