CSK vs RR: या सिझनचे दोन सर्वात तगडे संघ एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कोण मारणार बाजी..
CSK vs RR: आयपीएलच्या सोळाव्या (IPL season16) हंगामातील सतरावा सामना आज चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) आणि राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) यांच्यामध्ये रंगणार आहे. हे दोन्ही संघ या हंगामातील सर्वात तुल्यबळ संघ असून, क्रिकेट चाहत्यांना रोमहर्षक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग घरच्या मैदानावर दुसरा सामना खेळत असल्याने या सामन्यात त्यांना अडवांटेज असल्याचं बोललं जात आहे. मात्र संजू सॅमसनचा (Sanju Samson) राजस्थान रॉयल्स संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून चेन्नईशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Chennai super kings vs rajsthan royals IPL season16)
या हंगामात दोन्ही संघानी आतापर्यंत तीन-तीन सामने खेळले आहेत. दोन्ही संघ दोन विजय आणि एका पराभवासह गुणतालिकेत दुसऱ्या आणि पाचव्या स्थानकावर आहेत. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या तर चेन्नई सुपर किंग पाचव्या क्रमांकावर आहे. दोघांचेही गुण सारखेच आहेत मात्र रनरेटचा फरक आहे. राजस्थान रॉयल चा संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चेन्नई सुपर किंग संघाच्या तुलनेत समतोल वाटत आहे.
दोन्ही संघाच्या जमेच्या बाजू
दोन्ही संघांच्या जमेच्या बाजूची तुलना करायची झाली तर दोन्हीं संघाची फलंदाजी मजबूत आहे. खास करून दोन्ही संघाचे टॉप बॉर्डर अधिक धोकादायक आणि फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळतं. चेन्नई सुपर किंग संघापेक्षा राजस्थान रॉयल्स संघाची फलंदाजी थोडीशी मजबूत आहे. मात्र टॉप बॉर्डर फेल झाल्यानंतर, राजस्थान संघाच्या फलंदाजांनी देखील स्ट्रगल केला आहे. पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघाची मदार दोन्हीं सलामीवीर आणि संजू सॅमसनवर असणार आहे.
राजस्थान रॉयल संघापेक्षा चेन्नई सुपर किंग्स संघाची फलंदाजी थोडीशी कमकुवत असल्याचं दिसते. राजस्थान रॉयल्स संघाकडे अधिक मजबूत गोलंदाजी असल्याने चेन्नई सुपर किंग संघाच्या फलंदाजांपुढे हे मोठे आव्हान असणार आहे. चेपॉकची खेळपट्टी स्पिनर्सला मदत करणारी असल्याने, राजस्थान रॉयल्स हा संघ या सामन्यात अधिक वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
स्पिनर ठरवणार सामन्याची दिशा
राजस्थान रॉयल्स संघाकडे चेन्नई सुपर किंग संघापेक्षा अधिक मजबूत स्पिन अटॅक आहे. रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, मुरुगन अश्विन, फिरकीपटूंची जबाबदारी पार पाडणार आहेत. या गोलंदाजांना खेळणं चेन्नईच्या फलंदाजांना अवघड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग संघात ऑफ स्पिनर नसल्याने ही एक कमी या संघाला सतावणार आहे. मोईन अलीच्या रूपात त्यांच्याकडे एक ऑफ स्पिनर असला तरी त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. रवींद्र जडेजा आणि मिचेल सँटनर चेन्नई कडून स्पिन अटॅक सांभाळणार आहेत.
वानखेडे मैदानावर मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई कडून रवींद्र जडेजा आणि मिचेल सँटनर उत्कृष्ट कामगिरी करत चेन्नई सुपर किंग संघाला विजय मिळवून दिला. या दोघांची कामगिरी मुंबई विरुद्धच्या सामन्यात निर्णायक ठरली होती. मात्र राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान या दोघांसमोरही असणार आहे. स्पिन विरुद्ध संजूचा स्ट्राईक रेट 165 च्या जवळपास आहे.
या विभागात राजस्थान तुल्यबळ
राजस्थान रॉयल संघाची या हंगामात दमदार कामगिरी राहिली आहे. फलंदाजी या संघाची जमेची बाजू असली तरी त्याहून अधिक तुल्यबळ गोलंदाजी आहे. याकडे दुर्लक्ष झालं आहे. राजस्थान रॉयल्स संघाच्या फलंदाजीची मदार दोन्ही सलामीवीर आणि संजूवर आहे. चेन्नई सुपर किंग संघाला हे तीनही फलंदाज लवकर बात करण्यात यश आले तर सामना एकतर्फी होऊ शकतो. मात्र राजस्थान रॉयल संघाने 170 धावा केल्या, तरीही चेन्नई समोर विजयाचं मोठं आव्हान असणार आहे. जेसन होल्डर, आर अश्विन, एम अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल हे गोलंदाज गोलंदाजीची कमान सांभाळणार आहेत.
दोन्ही संघांची अशी असेल अंतिम अकरा
चेन्नई: अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, हंगरगेकर, महेश थेक्षाना, एमएस धोनी ( कॅप्टन विकेटकीपर) मिचेल सँटनर, राजवर्धन तुषार देशपांडे
राजस्थान: संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर जेसन होल्डर, आर अश्विन, एम अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
हे देखील वाचा Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम