Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने या योजनेत गुंतवा 12 हजार 500 आणि २१ व्या वर्षी मिळवा ६५ लाख; जाणून घ्या सविस्तर..
Sukanya Samriddhi Yojana: महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार (central government) महिलांच्या अनेक योजना राबवत आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर, तिच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, लग्नासाठी देखील आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून एकविसाव्या वर्षी तब्बल 65 लाख रुपये मिळतात. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) असं या योजनेचे नाव आहे. जाणून घेऊया, या योजनेविषयी सविस्तर.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या पित्याला आपल्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करता यावं. शिक्षण तसेच इतर कार्याला देखील आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही एक दीर्घकालीन योजना असू, या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्मल्यानंतर पित्याला काही अटी आणि शर्ती पूर्ण करायच्या आहेत. मुलगी जेव्हा २१ वर्षाची होते, तेव्हा तिला या योजनेच्या माध्यमातून तब्बल ६५ लाख रुपये मिळणार आहेत.
व्याज दरात वाढ
केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना २०१५ आली सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा व्याजदर आता 7.6% टक्क्यावरून तब्बल ८ टक्के करण्यात आला आहे. 2015 ते 2023 या कालावधीमध्ये या योजनेअंतर्गत एकूण तीन कोटी पालकांनी लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत मुलींना एकविसाव्या वर्षी पैसे काढता येणार आहेत. मात्र 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही या खात्यातून काही रक्कम काढू शकता.
योजनेचा कालावधी
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी 21 वर्ष असणार आहे. मात्र तुम्हाला केवळ पंधरा वर्षे या योजनेत पैसे भरावे लागणार आहेत. पंधरा वर्षानंतर, पुढचे सहा वर्ष हे खात चालूच राहते. मात्र तुम्हाला पैसे काढता येत नाहीत. मुलीच्या १८ वर्षानंतर मात्र शिक्षणासाठी काही रक्कम काढू शकता. ज्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी आहे, अशा मुलींसाठी त्यांच्या पालकांच्या नावाने बँक अकाउंट काढले जाते.
रकमेची गुंतवणूक
सुकन्या समृद्धी योजनेत 250 रुपये ते 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. केंद्र सरकारने या योजनेत आता बदल केला आहे. यापूर्वी ज्या पित्याला केवळ दोनच मुली आहेत, अशाच लाभार्थ्यांना लाभ घेता येत होता. मात्र आता एका मुलीच्या जन्मानंतर जर तुम्हाला दोन जुळ्या मुली असतील, तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचे स्वरूप
मुलीच्या जन्मापासून पालकांना दरमहा 12 हजार पाचशे रुपये गुंतवायचे आहेत. ही रक्कम तुम्हाला पंधरा वर्षांपर्यंत जमा करायची आहे. म्हणजेच, दरवर्षी तुम्हाला दीड लाख रुपये जमा करावे लागतील. तुम्ही दीड लाख रुपये पंधरा वर्षे भरल्यानंतर, ही रक्कम 22 लाख 50 हजार इतकी होते. ही रक्कम तुम्ही मुलीचे वय 21 झाल्यानंतर काढू शकता. मुलीचे वय एकवीस झाल्यानंतर, तुम्हाला साडेबावीस लाखाचे 65 लाख 93 हजार 71 रुपये मिळतात.
असा घ्या लाभ
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जाऊन या योजनेचं खातं उघडायचं आहे. समृद्धी योजनेमध्ये तुम्ही रोख रक्कम, त्याचबरोबर चेक, डिमांड ड्राफ्ट, तसेच बँकद्वारे देखील रक्कम भरू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. बँक किंवा पोस्टात जाऊन या संदर्भात चौकशी केल्यानंतर, तुम्हाला कागदपत्राविषयी सविस्तर माहिती मिळेल.
हे देखील वाचा Post Office RD: फक्त दहा हजार गुंतवा, मिळेल 16 लाखांचा परतावा; होय ही आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना..
Free Silai Machine Yojana: महिलांना मिळतेय मोफत शिलाई मशीन; या पध्दतीने करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम