CRPF Recruitment 2023: CRPF मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांची मेगा भरती; 10+12 पोरांनो लगेच जाणून घ्या अपडेट..

0

CRPF Recruitment 2023: सरकारी नोकरी (government job) करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात नोकरी जर सैन्य दलात असेल तर स्वप्न सत्यात उतरण्यासारखं असतं. देशातील असंख्य तरुण-तरुणी सैन्य दलात भरती होण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. देशासाठी आपल्याला ही सेवा करण्याची संधी मिळावी. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून असंख्य तरुण सैन्य भरतीकडे आस लावून बसलेला असतो. जर तुम्ही देखील सैन्य भरतीची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ही ऐतिहासिक आणि सुवर्णसंधी असणार आहे. CRPF Recruitment 2023:

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरी करण्याची देशातील तरुणांकडे ही मोठी संधी असणार आहे. कारण गृहमंत्रालयाकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाविषयी मोठी अपडेट प्रसारित करण्यात आली आहे. तब्बल एक लाख तीस हजार रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती होण्याची तरुणांकडे ही ऐतिहासिक संधी असणार आहे. जाणून घेऊया सविस्तर.

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये स्तर 3 पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातली सविस्तर अधिसूचना आणि तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील अधिसूचना crpf.gov.in या वेबसाईटवर जारी करण्यात येईल. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर, या संदर्भातली अपडेट महाराष्ट्र लोकशाहीवर देखील मिळेल. आता गृह विभागाकडून १ लाख तीस हजार CRPF कॉन्स्टेबल पदाची भरती केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पदांची संख्या

गृह विभागाकडून जारी केलेल्या माहिती नुसार तब्बल 1लाख 29 हजार 929 पदे भरण्यात येणार आहेत.1 लाख 25 हजार 262 पदे ही पुरुषांसाठी तर 4 हजार 467 महिला उमेदवारांसाठी असणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. सोबतच कॉन्स्टेबल या पदासाठी एकूण पदाच्या 10 टक्के जागा ह्या माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.

शैक्षणिक पात्रता?

या विभागामध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? आपण हे देखील सविस्तर जाणून घेऊ. सीआरपीएफ सैन्य भरतीमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा/ पगार 

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये स्तर 3 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय 18 ते 23 यादरम्यान असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांची कॉन्स्टेबल या पदासाठी निवड होणार आहे, अशा उमेदवारांना 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपयांपर्यंत दरमहा वेतन दिले जाणार आहे.

शारीरिक चाचणी नियम

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये तुमची उंची 170cm असणे आवश्यक आहे. जर तुम्ही महिला उमेदवार असाल, तर तुमची उंची 157 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. याबरोबरच पुरुषांची छाती 80 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. छाती फुगवून 85 सेमी होणे गरजेचे असणार आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार 

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला शारीरिक चाचणी बरोबर वैद्यकीय चाचणी त्याचबरोबर लेखी चाचणी देखील द्यावी लागणार आहे. या तीनही चाचण्यांच्या आधारे गुणांची यादी तयार केली जाईल. या यादीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा OnePlus Nord CE3 lite: OnePlus चा खतरनाक स्मार्टफोन लॉन्च; 108MP कॅमेरा असणारा फोन केवळ 20 हजारात..

Wedding viral video: स्टंटबाजीच्या नादात नवरीचा सुंदर चेहरा झटक्यात जळाला; पाहा व्हिडिओ..

RR vs PBKS: ही एक चूक आणि या एका खेळाडूमुळे राजस्थान रॉयल्सने गमावला सामना..

PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Mobile Aadhaar linking: आता आधार कार्डला सिमकार्ड लिंक करणे अनिवार्य; जाणून घ्या सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची प्रोसेस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.