Xiaomi Smartphone Launched: Xiamo चा 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरावाला दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च; किंमत फक्त ९ हजार..
Xiaomi Smartphone Launched: Xiaomi ही चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. मात्र तरीदेखील या कंपनीने अनेक तरुणांना आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे भुरळ घातली आहे. अनेक जण याच कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करताना पाहायला मिळतात. कमी किंमत आणि दर्जेदार स्मार्टफोन (smartphone) मिळत असल्याने, ग्राहक या कंपनीच्या स्मार्टफोन खरेदीकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते. आता पुन्हा एकदा मार्केट गाजवण्यासाठी या कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनची निर्मिती केली आहे.
Xiaomi या कंपनीने लॉन्च केलेल्या स्मार्टफोनची किंमत केवळ 9000 रुपये ठेवण्यात आली असून, यामध्ये ग्राहकांना तब्बल 5,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा मिळत आहे. कंपनीने Redmi 12C आणि Redmi Note 12 हे दोन स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत. यापूर्वी कंपनीने Redmi Note 12 हे व्हेरियंट 5 G मध्ये लॉन्च केले होते. मात्र आता हे 4G मध्ये लॉन्च केले आहे. जाणून घेऊया सविस्तर.
किंमत
सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये हेही कंपनी अनेक दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करत असते. आता पुन्हा एकदा या कंपनीने Redmi 12C हा स्मार्टफोन लाँच केला असून या फोनची किंमत केवळ 8999 रुपये ठेवली आहे. यामध्ये ग्राहकांना 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळणार आहे. 6GB रॅमसह 128GB स्टोरेजचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला 10 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत.
Redmi Note 12 4G या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 64GB चा स्टोरेजचा हेरियंटमध्ये देण्यात येतो. तर 6GB, 128 GB व्हेरियंट smartphone तुम्हाला खरेदी करायचा असेल तर 16 हजार 999 रुपये मोजावे लागतील.
फीचर्स
Redmi 12C या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.71 इंच एचडी डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर 60Hz चा स्टँटर्ड रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, तुमजला MediaTek HelioG85 चिपसेट मिळत आहे. Redmi 12C अँड्रॉइड 12 वर आधारित तसेच MIUI 13 वर काम करतो.
बॅटरी आणि कॅमेरा
Redmi 12C या स्मार्टफोनला तब्बल 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेरा विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.
Redmi Note 12 विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, याचा display 6.67 इंच आहे. यात तुम्हाला SuperAMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच या स्मार्टफोनचा प्रोसेसर देखील दमदार आहे. Qualcomm Snapdragon 685 चिपसेट देण्यात आला आहे.
Redmi Note 12 चा camera 50MP दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 50MP, 8MP, आणि 2 MP कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा दिली गेला आहे. त्याचबरोबर 5,000mAh बॅटरी देखील असणार आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसाठी 33W चार्जर देण्यात आला आहे.
हे देखील वाचा Samsung Smartphone: 9,500 रुपयात सॅमसंगचा 8 GB रॅम आणि 50 MP ट्रिपल कॅमेरा फोन; जाणून घ्या कुठे चालू आहे ऑफर..
PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..
PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..
Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम