PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

0

PAN-Aadhaar Linking: आता आधार कार्ड (aadharcard) पॅन कार्ड (pancard) जोडणे सरकारने अनिवार्य केले आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर तुम्हाला दंडाबरोबर कारवाईला देखील सामोरे जावं लागेल. सरकारने आता आधार सोबत पॅन कार्ड जोडण्याची तारीख तीन महिने वाढवून दिली असली तरी अजूनही अनेकांनी आधारशी पॅनकार्ड जोडलं नसल्याचं पाहायला मिळतं. जर तुमचं पॅन आधारशी जोडलं आहे की नाही? हे तपासायचे असेल, तरी देखील तुम्हाला हे जाणून घेता येणार आहे. आपण आधारशी पॅन कार्ड जोडलं आहे की नाही हे कसं पाहायचं? सोबतच ते कसं जोडायचं? याविषयी सोप्या भाषेत सविस्तर जाणून घेणार आहोत.

सुरुवातीला आपण पॅन कार्ड म्हणजे काय? हे जाणून घेऊ..

पॅन कार्ड म्हणजे, “परमनंट अकाउंट नंबर” जो आयकर विभागाकडून तुम्हाला दिला जातो. “Income Tax Return” भरण्यासाठी हा नंबर अनिवार्य आहे. पन्नास हजारापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करायचे असतील, तर तुम्हाला पॅन कार्ड बंधनकारक आहे. आयकर विभाग पॅन कार्डच्या माध्यमातून तुमच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे काम करत असते.

पॅन कार्ड असल्यामुळे मोठे आर्थिक गैरव्यवहार तळता येण्यासाठी सरकारला याची मदत होते. प्रत्येक नागरिकांकडे केवळ एकच ओळखपत्र असावं, हा सरकारचा उद्देश आहे. यासाठी रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन, सारखे अनेक ओळखपत्र जवळ बाळगण्या ऐवजी सगळ्यांचं एकच ओळखपत्र बनवण्याचा सरकारचा हेतू आहे. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. आणि म्हणून आधारकार्डला पॅन कार्ड देखील जोडलं जाणं आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मुदतीमध्ये झाली वाढ

आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत सरकारने यापूर्वी 31 मार्च 2023 ठेवली होती. मात्र आता या मुदतीमध्ये तीन महिने वाढ करण्यात आली आहे. आधारशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता ग्राहकांना 30 जून 2023चा कालावधी देण्यात आला आहे. जर 30 जून 2023 पर्यंत ग्राहकांनी आपल्या आधारशी पॅन कार्ड लिंक केलं नाही, तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे आयकर विभागाने म्हटलं आहे.

असं तपासा आधार-पॅन जोडलेले आहे की नाही?

आपल्या आधार कार्डशी पॅन कार्ड जोडलं आहे की नाही, हे तपासण्यासाठी किंवा खात्री करण्यासाठी तुम्हाला, आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या साईटवर जावे लागणार आहे. त्यांनतर ‘To view status if you already submitted link Aadhaar status या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.proteantech.in/ या लिंकचा वापर करा. याठिकाणी तुम्ही तुमचे पॅन आणि आधार क्रमांक टाका. त्यांनतर ‘View Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी पॅन लिंक आहे का? हे समजणार आहे.

एसएमएसद्वारे देखील तपासा..

वरील प्रक्रिया जर तुम्हाला किचकट वाटत असेल, तर तुम्ही एसएमएसच्या सहाय्याने देखील तुमचं आधार पॅन लिंक आहे की नाही, हे तपासू शकता. यासाठी तुम्हाला “UIDPAN< (१२ अंकी आधारकार्ड नंबर) <(१० अंकी पॅन कार्ड नंबर)>” असा संदेश 567678, 56161 या दोन क्रमांकावर पाठवायचा आहे. यानंतरच तुम्हाला सविस्तर माहिती समजेल.

असं जोडा आधारशी पॅन कार्ड

आधार कार्डला पॅन कार्ड जोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन https://www.incometax.gov.in/iec/foportal/ असं सर्च करायचं आहे. त्यांनतर ‘क्विक लिंक्स’ या पर्यायमध्ये “लिंक आधार” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक रकाना दिसेल, त्यात तुमचं आधार आणि पॅन नंबर टाकायचं आहे.

नंतर “Continue to Pay Through e-Pay Tax” या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोरच्या रकान्यात तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, हा ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर, “Pay Tax page” हे नवीन पेज ओपन होईल.

त्यानंतर “प्रोसेस” या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला २०२३-२४ हे साल निवडायचं आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला “Other Receipts” यावर क्लिक करायचं आहे. पैसे भरल्यानंतर, तुम्हाला “ई फायलिंग पोर्टलवर पुन्हा एकदा जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून ही फायलिंग ओपन करायचं आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर “लिंक आधार” नावाची एक विंडो ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, इत्यादी, माहिती पाहायला मिळेल. जर तुमच्या संदर्भातली ही माहिती अचूक असेल, तर तुम्ही “link now” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. या सविस्तर प्रोसेसनंतर तुमचं पॅन आधारशी जोडले जाणार आहे. तसा तुम्हाला एसएमएस देखील येईल.

हे देखील वाचा PAN Card Apply Online: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पॅन कार्ड कसं काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.. 

Business Idea: एकदाच गुंतवणूक करून वर्षाला कमवा लाखो रुपये; जाणून घ्या या जबरदस्त व्यवसाय विषयी..

Onion Subsidy: एका क्विंटलसाठी 350 रुपये अनुदान; कांद्याच्या अनुदानासाठी असा करा अर्ज..

Prajakta Mali: प्राजक्ता माळी पडली प्रेमात, पोस्ट शेअर करत म्हणाली, देखा जो तुमको ये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.