EPFO Recruitment 2023: बारावी आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; या विभागामध्ये 2859 जागांसाठी भरती..

0

EPFO Recruitment 2023: जर तुम्ही बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमचा शोध या ठिकाणी पूर्ण होणार आहे. नोकरी मिळवणे सध्याच्या काळात खूप अवघड असलं तरी देखील आता अनेक विभागांमध्ये मोठ्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. मात्र या संधीचा वेळेत फायदा उमेदवारांनी उचलणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. जाणून घेऊया सविस्तर. सेंट्रल बँकेत पाच हजार पदांची मेगा भरती; या उमेदवारांना करता येणार अर्ज..

भविष्य निधी संघटनेमध्ये (EPFO) आता तब्बल अडीच हजाराहून अधिक रिक्त जागांची पदभरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण (12th pass job) त्याचबरोबर पदवीधर उमेदवारासाठी ही एक मोठी संधी आहे. जाणून घेऊया, या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

सामाजिक सुरक्षा सहाय्यक” या पदासाठी एकूण 2674 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून उमेदवारांनी बॅचलर पदवी संपादन करणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराने टायपिंगचा कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी टायपिंगची गती इंग्रजीमध्ये प्रति मिनिटाला 35 शब्द टाईप करणे आवश्यक आहे. तर हिंदीमध्ये तीस शब्द एका मिनिटांमध्ये उमेदवाराने टाईप करणे आवश्यक आहे.

लघुलेखक” या पदासाठी १८५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच कौशल्य चाचणी हा मापदंड देखील ठेवण्यात आला आहे. आता आपण उमेदवारांची वयोमर्यादा काय ठेवण्यात आली आहे? हे जाणून घेऊ.

वयोमर्यादा

या भरती प्रक्रियेस पात्र होण्यासाठी उमेदवाराने 26 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवार 18 ते 27 वर्ष यादरम्यान असायला हवे. प्रवर्गानुसार उमेदवारांच्या वयोमर्यादामध्ये सूट दिली जाणार आहे. यात ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष, तर एससी/एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी

सर्वसाधारण कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. ओबीसी उमेदवारांसाठी देखील हाच नियम लागू असणार आहे. मात्र एससी/एसटी तसेच महिला आणि माजी सैनिक या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

पगार

निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहे. “सामाजिक सुरक्षा सहाय्यक” या पदासाठी उमेदवारांना दरमहा 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये पगार मिळणार आहे. “लघुलेखक” या पदासाठी दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 पगार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण आणि निवड प्रक्रिया 

निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांच्या निवडीचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये प्राथमिक परीक्षा हा पहिला टप्पा असणार आहे. मुख्य परीक्षा हा दुसरा टप्पा आणि कौशल्य चाचणी हा तिसरा टप्पा असणार आहे. जो संगणक डेटा एन्ट्री चाचणीच्या आधारे घेतला जाणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

उमेदवारांना 26 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.epfindia.gov.in असं सर्च करायचं आहे. तर तुमच्यासमोर या विभागाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला सविस्तर अर्ज करता येणार आहे. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

Chanakya Niti: या चार गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास याल रस्त्यावर; जाणून घ्या ध्येयप्राप्तीचे चार मार्ग..

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यापासून या सहा राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य..

Samsung Galaxy S20 FE 5G: 75 हजाराचा हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 30 हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सविस्तर..

Viral video: तृतीयपंथी सांगून पैसे मागणाऱ्या तरुणाला बाजारातच केलं नग्न; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.