Raj Thackeray speech: उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे धावले; एकनाथ शिंदेंना म्हणाले थांबवा हे..

0

Raj Thackeray speech: एखाद्या चित्रपटाच्या कथेला देखील लाजवेल अशा घटना २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) घडल्या आहेत. भाजपच्या (BJP) मदतीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गुजरातला नेले. महाविकास आघाडीचे सरकार (maha Vikas aaghadi government) अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. महविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर, राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली. तेव्हापासून राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात.

काल नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या सभेत (Raj Thackeray gudi padwa sabha) राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना खुश करण्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला. उद्धव ठाकरे बरोबरच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका करत त्यांना मोलाचा सल्ला दिला. एकनाथ शिंदे बरोबर महाराष्ट्राच्या सरकारवर देखील राज ठाकरे यांनी टीका केली.

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे शिवतीर्थावर बोलताना म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारचे याकडे लक्ष नाही. हे प्रश्न सोडवण्याऐवजी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे जिथे सभा घेतील, तिथे जाऊन सभा घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा हे थांबवलं पाहिजे. संधी मिळाली आहे, तर राज्याच्या हिताचं काम कसं करता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

ठाकरे यांनी वरळीत सभा घेतली, एकनाथ शिंदे यांनी लगेच वरळीत सभा घेतली. त्यांनी खेडला सभा घेतली, यांनी लगेच तिथे जाऊन सभा घेतली. ते तुम्हाला गुंतवून ठेवतील महाराष्ट्राचं काय होईल याचा विचार करा. असा सवाल उपस्थित केला. असले उद्योग उद्योग बंद करून राज्याचा विकास करण्याकडे लक्ष द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, उद्धव ठाकरे म्हणाले, मी भाषण पाहिलेही नाही. आणि पाहतही नाही. गेल्या अठरा वर्षापासून तीच तीच रेकॉर्ड घासून पुसून झालेली आहेत. मी यावर माझं भाष्य गेल्यावर्षी 14मे ला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एका चित्रपटाचा दाखला देत केलं होतं. तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्ही रेकॉर्ड काढून पाहा.

हे देखील वाचा Viral video: तृतीयपंथी सांगून पैसे मागणाऱ्या तरुणाला बाजारातच केलं नग्न; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ..

IND vs AUS: नाचता येईना अंगण वाकडे! संताप व्यक्त करत रोहित शर्माने या दोन खेळाडूंना पराभवासाठी धरले जबाबदार..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

Income Tax Bharti 2023: पदवीधर आणि दहावी पास उमेदवारांसाठी आयकर विभागात मोठी भरती; लगेच असा करा अर्ज..

Serial Kisser Gang Video: ..म्हणून एकटी महिला दिसली की जबरदस्तीने किस करून जायचा पळून; पाहा तो व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.