Malaika Arora Arjun Kapoor engagement: मलायका-अर्जुनचा साखरपुडा ठरला; या दिवशी पॅरिसमध्ये रंगणार सोहळा..

0

Malaika Arora Arjun Kapoor engagement: बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक सेलिब्रिटींचे आयुष्य फिल्मी स्टाईल राहिलं आहे. प्रत्येकाच्या रियल लाईफ आणि रिल लाईफमध्ये फरक असतो. मात्र बॉलीवूड मधील काही कलाकारांचे आयुष्य हे एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल असेही राहिले असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये सलमान खानचं (Salman Khan) नाव आपल्याला सर्वप्रथम घ्यावं लागेल. बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटींची लव लाइफ वादग्रस्त राहिली आहे. यामध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या कपलचा देखील समावेश आहे. आता या दोघांनी आपल्या आयुष्याला अधिकृतरित्या नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याने, बॉलीवूडमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे. लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याची सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगत असते. त्यांना अनेकदा नेटेकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नाबाबतही अनेक बातम्या आल्या. काही महिन्यांपूर्वी या दोघांनी साखरपुडा केला असल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या. यानंतर अर्जुन कपूर ने आपल्या इंस्टाग्राम वरून ही माहिती खोटी असल्याचं सांगत पिकविला या वेबसाईट व संताप व्यक्त केला होता. मात्र आता या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या असून, हे दोघेही पॅरिसमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या दोघांनी अनेक वर्ष रिलेशशिप लपून ठेवल्यानंतर, त्यांनी मागील दोन वर्षांपूर्वी सोशल मिडियावर आपल्या रिलेशनशिपची कबुली दिली. यांचं लग्न कधी होणार असा प्रश्न चाहते विचारत होते. त्यांच्यावर अनेक गोष्टीवरून टीकाही करण्यात आली. मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करून एकमेंकासोबत वेळ घालवताना दिसले. हे दोघे लव्ह बर्डस आता एकमेकांसोबत एन्जॉय करताना दिसत आहेत. कधी-कधी सोबतचे रोमँटिक फोटो ते सोशल मिडीयावर शेअर करताना दिसतात. त्यांनी आता आपल नात हे जगजाहीर केलं आहे. त्यामुळेच ते आता खुलेआम एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

प्रेमात वयाच काही बंधन नसत, हे या दोघांकडे पाहून लक्षात येत. या दोघांच्या वयात तब्बल 12 वर्षांचा फरक आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. याबाबत त्यांच्यावर अनेक टीकाही झाली. मात्र त्यांचं रिलेशनशिप कायम राहिले. मलायकाला तिच्या पहिल्या पतीपासून 20 वर्षांचा एक मुलगाही आहे. तिने 1998 ला अरबाज खान सोबत लग्न केले होते. लग्नाच्या 19 वर्षांनंतर ते दोघे विभक्त झाले. मात्र आता ती लवकरच अर्जुन कपूर सोबत आपल प्रेम परमनंट करणार आहे. पुढच्या आठवड्यात ते साखरपुडा करत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका लवकरच साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘फिल्म क्रिटीक उमैर संधू’ यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मलायका आणि अर्जुन हे पुढील आठवड्यात सारखपुडा करणार असल्याचं सांगितलं आहे. सिटी ऑफ लव्ह म्हणून ओळख असणाऱ्या पॅरिसमध्ये या लव्ह बड्सचा साखरपुडा होणार आहे. अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

पॅरिस हे मलायका आणि अर्जुन या दोघांच्या आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे ते आपला सारखपुडा इथे करणार आहेत. त्यांच्या साखर सारखपुड्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सारखपुडा पार पडणार आहे. तसेच येत्या मार्चमध्ये ते लग्न करण्याची शक्यता आहे. अशी माहिती आहे. मात्र या दोघांनी याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

हे देखील वाचा Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

Chanakya Niti: वैवाहिक जीवनात ‘या’ चुका केल्या तर कोणीही वाचवू शकणार नाही तुमचं नातं..

Tips For Married Couple: पती पत्नीच्या नात्यात कायम ओलावा ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.