Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..
Chanakya Niti: पुरुष म्हटलं की स्त्रियांकडे आकर्षित होणार ही सामान्य बाब आहे. मात्र एका सर्वेक्षणातून लग्नानंतर पुरुष नेहमी पत्नीशिवाय इतर महिलांकडे अधिक आकर्षित होत असल्याचं समोर आलं आहे. तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये विवाहबाह्य संबंध खूप मोठा गुन्हा समजला जातो. विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाल्याचे तुम्ही आसपास देखील पाहिलं असेल. विवाहबाह्य संबंध मोठा गुन्हा असून देखील अनेक जण विवाहबाह्य संबंध ठेवताना दिसून येतात. मात्र पत्नी असून देखील पुरुषांना विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) ठेवण्याची इच्छा का होते? जाणून घेऊया सविस्तर. (Relationship tips)
आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) फार मोठे विद्वान होते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती (Chanakya niti) हा ग्रंथ लिहून ठेवला आहे. या ग्रंथाचा अवलंब करून अनेकजण आपलं आयुष्य सुखकर करत असल्याचे देखील पाहायला मिळतं. आचार्य चाणक्य यांनी अनेक विषयांवर लिखाण करून ठेवलं आहे. माणसाचा स्वभाव, त्याचबरोबर नातेसंबंध यावर देखील चाणक्य यांनी विस्तृतपणे लिहिलं आहे. चाणक्य यांनी लग्नानंतर विवाहित पुरुष इतर महिलांसोबत सबंध का ठेवतात? त्याचबरोबर विवाहित स्त्रिया देखील इतर पुरुषांकडे का आकर्षित होतात? याविषयी सविस्तर भाष्य केले आहे.
पती-पत्नीच्या नात्यामध्ये शारीरिक संबंधाला विशेष महत्व आहे. पती-पत्नी दोघांचेही एकमेकांकडून शारीरिक समाधान होत नसेल, तर अर्थात दोघेही इतर पुरुष किंवा महिलांकडे आकर्षित होण्याच्या घटना घडतात. असं चाणक्य सांगतात. नात्यांमध्ये ओलावा कायम ठेवण्यासाठी दोन्हीं पार्टनरला शारीरिक समाधान मिळणं फार आवश्यक असतं. जर शारीरिक संबंधांमध्ये कमतरता दिसून येत असेल, तर नात्यात कटूता निर्माण होण्यास मदत होते. असं आचार्य चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार ज्या पुरुषांचे किंवा महिलांचे कमी वयामध्ये लग्न होतं खासकरून त्यांच्यामध्ये ही समस्या निर्माण होते. कमी वयात अचानक लग्न झाल्यानंतर, अंगावर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात. साहजिकच यामुळे परिपक्वता निर्माण व्हायला वेळ लागतो. कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर, लग्नासंदर्भात देखील पुरुषांना फारसे गांभीर्य नसते. साहजिकच यामुळे त्यांच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात.
आचार्य चाणक्य यांच्यामध्ये लग्नानंतर पुरुष इतर महिलांकडे आकर्षित होण्याला अनेक करणे आहेत. त्यापैकी महत्वाचं कारण म्हणजे, लग्नानंतर आपल्या जोडीदाराविषयी हळूहळू आकर्षण कमी व्हायला सुरुवात होते. जोडीदाराचा वजन वाढलं तरीदेखील शारीरिक आकर्षण कमी होते. त्याचा परिणाम भावनिक नात्यावर देखील होतो.
कोणत्याही नात्यांमध्ये विश्वासाला फार महत्त्व आहे. खासकरून पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास खूप मोठा रोल अदा करतो. पती पत्नीचा एकमेकांवर विश्वास नसेल, तर नातं फार काळ टिकू शकत नाही. दोघांनीही एकमेकांना विश्वासात घेऊन अनेक गोष्टींविषयी चर्चा करणे आवश्यक असते. जर तुम्ही एकमेकांप्रती अविश्वास दाखवू लागला तर, आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी पुरुष किंवा स्त्री विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा विचार करते. असं आचार्य चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते लग्नानंतर पती-पत्नी दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात. मुलाच्या जन्मानंतर मानसिक आणि शारीरिक बदल देखील होत असतात. मूल जन्मल्यानंतर दोघांचंही एकमेकांकडे पूर्वीसारखं लक्ष राहत नाही. साहजिकच यामुळे आपल्या पत्नीला आपल्याविषयी आकर्षण किंवा आपुलकी, प्रेम या गोष्टी राहिल्या नाहीत, असा देखील समज पुरुषांचा होतो. साहजिकच यामुळे पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवण्याकडे वळतात. असं आचार्य चाणक्य सांगतात.
हे देखील वाचा IND vs AUS: स्मिथ-वॉर्नर प्रमाणे जडेजानेही केली चेंडू सोबत छेडछाड; व्हिडिओ समोर आल्याने उडाली खळबळ..
Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..
Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..
Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम