IND vs AUS: स्मिथ-वॉर्नर प्रमाणे जडेजानेही केली चेंडू सोबत छेडछाड; व्हिडिओ समोर आल्याने उडाली खळबळ..
IND vs AUS: बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (border gavaskar test series) पहिला सामना नागपूरच्या क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 1st test) यांच्यामध्ये सुरू आहे. भारतीय संघाने कांगारूंवर पहिल्या दिवशी वर्चस्व प्रस्थापित केले. रवींद्र जडेजाने केलेल्या भेदक माऱ्यात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद झाला. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख पाच फलंदाजांना तंबूत पाठवत उत्कृष्ट कामगिरी केली. एकीकडे रवींद्र जडेजाने उत्कृष्ट कामगिरी केली असती तरी दुसरीकडे मात्र त्याच्यावर बॉल सोबत छेडछाड केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. (Ravindra Jadeja allegation of tampering with the ball)
कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच पहिला कसोटी सामना खेळपट्टीमुळे वादात सापडला होता. ऑस्ट्रेलियन मीडियाने (Australia media) खराब खेळपट्टी तयार केली असल्याचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलिया संघात डावखुरे फलंदाज असल्याने खेळपट्टी मुद्दामहून एका बाजूला रफ ठेवण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला असतानाच, सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुन्हा नवीन वाद निर्माण झाल्याने आता पहिला कसोटी सामना वादात सापडला आहे.
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय सलामीवीर गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना लागोपाठ तंबूत पाठवत जबर धक्का दिला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा यांनी डावाची सूत्रे आपल्या हातात घेत ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांचे कंबरडं मोडून काढले. रवींद्र जडेजाने पाच तर अश्विनने तीन फलंदाज तंबूत पाठवत कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर करून दिला. ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात केवळ 177 धावा करता आल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज (या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने बॉल सोबत छेडछाड केल्याचा आरोप केला. Ravindra Jadeja and Mohammed Siraj Ball tampering) आणि एकच खळबळ उडाली. ऑस्ट्रेलिया मीडियाकडून रवींद्र जडेजावर कारवाई करण्याचे मागणी केली जात असून, आता हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
Cheater 😂
Dear @ICC notice this…#BGT2023 #INDvsAUS #RavindraJadeja pic.twitter.com/4e86CgLAqw— Hanzalah.10 (@hanzalahsays) February 9, 2023
वस्तस्थिती काय?
रवींद्र जडेजा गोलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजच्या हातातून काहीतरी घेऊन बोटांना चोळत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र ऑस्ट्रेलियन मीडियाने याला बॉल सोबत छेडछाड केल्याचं म्हणत रवींद्र जडेजावर आरोप केले आहेत. रवींद्र जडेजाने बॉल सोबत छेडछाड केली नसून, तो फक्त बोटाला झालेल्या दुखापतीवर मलम लावत असल्याचे बोललं जात आहे. आता या व्हिडिओची ऑस्ट्रेलियन मीडियाकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात येत असून, आयसीसीने याविषयी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे देखील वाचा Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..
Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..
Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम