IND vs AUS: T20 नंतर कसोटी संघातूनही केएल राहुलचा पत्ता कट..

0

IND vs AUS: 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. (Border gavaskar test series) चार सामन्याची ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण या मालिकेवर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणार आहे की नाही हे ठरणार आहे. गेल्या वेळेस भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र न्युझीलंड संघाकडून भारताचा पराभव झाल्याने पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीने भारताला हुलकावणी दिली होती. (World test championship final)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे भवितव्य या मालिकेवर अवलंबून असल्याने भारत कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नसल्याची माहिती मिळते आहे. सीनियर आणि जूनियर असा भेदभाव केला जाणार नसून मेरीटवरच खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी दिली जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारत केएल राहुल (KL Rahul) ऐवजी अंतिम 11 मध्ये सलामीवीर शुभमन गिलचा (Shubman Gill) समावेश करणार आहे. (Rohit Sharma)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. सध्या शुभमन गिल कमालीचा फॉर्ममध्ये असून, तो खोऱ्याने धावा ओढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पाठीमागच्या चार एकदिवसीय सामन्यात त्याने तीन दमदार शतके ठोकत आता आपण अंतिम अकरामधून बाहेर बसू शकत नसल्याचा एक प्रकारे इशारा दिला आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघे 23 तारखेला विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी राहुलने हनिमूनचा प्लॅन देखील कॅन्सल केला. एकीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या शुभमनला आपल्या अनुपस्थित अंतिम आकरामध्ये संधी मिळाली, तर तो आपली जागा धोक्यात आणू शकतो हा विचार राहुलने केला असल्यानेच हनिमूनचा प्लॅन कॅन्सल केल्याचं बोललं जात आहे. मात्र असं असलं तरी देखील आता पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता कट करून शुभमनला संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात जर गिलला संधी मिळाली आणि त्याने या संधीचा सोनं केलं तर केएल राहुलचं कसोटी करिअर देखील धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिल आणि राहुल या दोघांची तुलना केली तर गिल कसोटी क्रिकेटमध्ये देखील राहुल पेक्षा उत्तम सलामीवीर असल्याचं स्पष्ट होत आहे. राहुलने आतापर्यंत 45 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये ३४.२६ च्या सरासरीने फक्त 2604 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या धावा फक्त 52 च्या स्ट्राईकरेटने बनवल्या आहेत. आणि म्हणूनच पहिल्या कसोटी सामन्यात राहुल ऐवजी गिलला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, केएल राहुल,चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, केएस भरत, मोहम्मद शमी, इशान किशन, उमेश यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, जयदेव उनादकट, रवींद्र जडेजा

हे देखील वाचा  mahendra singh dhoni: म्हणून धोनी अचानक पोहचला ड्रेसिंग रूममध्ये; काय झाली चर्चा, पाहा व्हिडिओ..

IND vs NZ: सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने जाहीर केली धक्का बसणारी प्लेइंग इलेवन..

INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही पृथ्वीला BCCI चा दणका..

Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..

Bank of Maharashtra Bharti 2023: या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांची मेगा भरती..

msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.