INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही ‘पृथ्वी शॉ’ला BCCI चा दणका..

0

INDvsNZ T20 series: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली पार पडलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. तीनही सामने भारताने दिमाखात जिंकत एक दिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले. एकादिवसीय मालिका नंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता टी-ट्वेंटी मालिकेकडे लागलं आहे. 27 तारखेपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. 27 तारखेला रांची येथे पहिला टी-ट्वेंटी सामना खेळवण्यात येणार आहे.

टी ट्वेंटी मालिकेसाठी निवडलेले अनेक नवीन खेळाडू सध्या रणजी क्रिकेट स्पर्धा सुरू असल्याने या स्पर्धेत खेळत आहेत. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दीपक हुडा (Deepak Hooda) यासह अनेक खेळाडू आपापल्या संघाकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळत आहेत. मात्र या खेळाडूंना बीसीसीआयने आता चांगलीच चपराक लगावली आहे. प्रचंड प्रतिक्षेनंतर अखेर बीसीसीआयने (BCCI) ‘पृथ्वी शॉ’ला टी-ट्वेंटी संघात निवडले. मात्र बीसीसीआयने ‘पृथ्वी शॉ’ला सक्त ताकीद दिली असल्याची माहिती आहे.

पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघाकडून mumbai (cricket team) रणजी क्रिकेट स्पर्धा (Ranji trophy) खेळत आहे. अशातच आता पुढचा सामना न खेळता 25 तारखेलाच रांचीमध्ये दाखल होण्याच्या सूचना बीसीसीआयकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या आणि t20 संघात निवड करण्यात आलेल्या खेळाडूंना देण्यात आल्या आहेत. रांचीमध्ये 27 तारखेला न्यूझीलंड बरोबर भारताचा पहिला टी-ट्वेंटी सामना होणार आहे. टी ट्वेंटी संघाचा भाग असणारे खेळाडू 27 तारखेला रांचीमध्ये दाखल होणार होते, अशी माहिती आहे. मात्र या खेळाडूंना सक्त ताकीद देत 25 तारखेला रांचीमध्ये दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भारताला आगामी t20 विश्वचषक हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळायचा आहे. बीसीसीआयने या संदर्भात अधिकृत घोषणा केली नसली तरी यापुढे t20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच असणार असल्याचे निश्चित झाले आहे. अनेक सिनियर खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून वगळून नवीन खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. आतापासूनच आगामी t20 विश्वचषकाची संघ बांधणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे टी-ट्वेंटी संघात आपले स्थान कायम करण्याची संधी नवीन खेळाडूंकडे असणार आहे.

राहुल त्रिपाठी, पृथ्वी शॉ हे खेळाडू भारतीय टी-ट्वेंटी संघाचा भाग असल्याने त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई संघातून काढून टाकण्यात आले आहे. टी ट्वेंटी संघाचा भाग असणारे खेळाडू आता रांचीत दाखल झाले आहेत. यामध्ये राहुल त्रिपाठी, पृथ्वी शॉ यांचा देखील समावेश आहे. 27 तारखेला रांची, 29 जानेवारीला लखनऊ, आणि एक फेब्रुवारीला अहमदाबाद या ठिकाणी तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यात येणार आहेत.

टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) सूर्यकुमार यादव (उपकर्णधार) पृथ्वी शॉ, शुबमन गिल, आर गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक),राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक) युझवेंद्र चहल, कुमार कुलदीप अर्शदीप सिंग, शिवम मावी, मुकेश यादव, उमरान मलिक

हे देखील वाचा msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Rahul Dravid: ..म्हणून कोहली रोहीतला टी-ट्वेंटी टीममधून वगळले; राहूल द्रविडच्या विधानाने खळबळ..

ICF Recruitment 2023: दहावी बारावी उमेदवारांसाठी या विभागात मोठी भरती; परीक्षा विना अशी केली जाणार निवड..

Ration Card: ब्रेकिंग! राज्य सरकारने जारी केला आदेश; गहू-तांदळाबरोबर या वस्तू मिळणार मोफत..

KL Rahul-Athiya Shetty: केएल राहुलचा हनिमून संदर्भात धक्कादायक निर्णय; रिसेप्शन पार्टीबद्दलही मोठा खुलासा..

BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.