BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..
BCCI: अनेकांचं क्रिकेटर व्हायचं स्वप्न असतं. प्रत्येकजण यासाठी दिवस रात्र मेहनत देखील करतो. आपल्यालाही एकदा तरी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळावी अशी प्रतेकाची अशी इच्छा असते. (Indian cricket team) मात्र सगळ्यांची ही इच्छा पूर्ण होइलच असं नाही. गुणवत्ता असून सुद्धा अनेकांचे संपूर्ण आयुष्य या इच्छेचा पाठलाग करताना निघून जाते. या व्यतिरिक्त संधी मिळाल्यानंतर उत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंना देखील अनेकदा दुर्लक्षित केले जाते. असच एका भारतीय दिग्गज फलंदाजाच्या बाबतीत झाले आहे. आपल्याला संधी मिळतं नसल्याने या खेळाडूने आता इतर देशाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. बीसीसीआयकडून अनेक नवीन खेळाडूंना भारतीय संघाची कॅप दिली जात आहे. मात्र पूरेशी संधी न देताच बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. भारतीय संघात संधी मिळत नसल्याने विश्वचषक विजेता भारतीय उंडर 19 संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने. क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. यामध्ये आता आणखी एका भारतीय सलामीवीराची भर पडली आहे.
ऊत्कृष्ट फलंदाज असणार्या या खेळाडूने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतू गेल्या ४ वर्षांपासून एकही आंतराष्ट्रीय सामना तो खेळलेला नाही. गेल्या काही वर्षात त्याला खेळण्याची संधीच देण्यात आली नाही. त्यामुळे त्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अशा वातावरणामुळे करिअरबाबत मोठा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे तो म्हणाला, तसेच सततच्या उपेक्षेमुळे आता इतर देशाकडून खेळण्याची वेळ आपल्यावर आली असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
माझी खेळण्याची प्रचंड इच्छा आहे. संधी मिळाल्यास मी ऊत्तम फलंदाजी करु शकतो. परंतू दुर्दैवाने मला संधीच मिळत नाहीये. भारतात एकदा तिशी ओलांडली की खेळाडूचा फारसा विचार होत नाही. त्यामुळे नाईलाजाने मला विदेशात संधी शोधाव्या लागत आहे. माझी खेळण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे बाहेरचा मार्ग निवडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे तो यावेळी म्हणाला. तसेच “बीसीसीआय सोबतची माझी साथ आता जवळपास पूर्ण होत आली आहे” अशा शब्दांत त्याने बीसीसीआयबाबत असणारी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘मुरली विजय’ असे या खेळाडूचे नाव असून, कधीकाळी त्याने भारतासाठी ऊत्कृष्ट फलंदाजी केली आहे. एकुण ६१ टेस्ट सामन्यांमध्ये १२ शतके आणि १५ अर्धशतके झळकावत ३ हजार ९९२ धावा त्याने केल्या आहेत. यासोबतच भारताकडून एकुण १७ एकदिवसीय सामने मुरली विजय (Murli Vijay) खेळला आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यात त्याने अखेरचा टेस्ट सामना खेळला होता. तसेच २०१५ मध्ये ईंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये ऊत्कृष्ट फलंदाजी करत त्याने आपले नाव सर्वदूर पोहचवले होते.
मुरली विजय आता ३८ वर्षाचा झाला आहे. त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार भारतीय क्रिकेट टीममध्ये आता त्याला संधी मिळणे कठीणच आहे. त्यामुळे विदेशात संधी शोधत असल्याचे त्याने बोलून दाखवले. एका मुलाखतीदरम्यान मुरली विजयने आपली नाराजी व्यक्त केली. मुरली विजय जरी आज ३८ वर्षाचा असला तरी भारतीय क्रिकेट संघातील काही तिशीच्या आतील खेळाडूंवर सुद्धा ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे बीसीसीआयने यावर चिंतन करावे अशा प्रतिक्रिया क्रिकेट विश्वात उमटत आहे.
हे देखील वाचा Sex Mistakes: सेक्स केल्यानंतर चुकूनही करू नका हे काम अन्यथा..
Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..
Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..
Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..
PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम