Sex Mistakes: सेक्स केल्यानंतर चुकूनही करू नका हे काम अन्यथा..

0

Sex Mistakes: सेक्स हा मानवी जिवनातील फार महत्वाचा विषय आहे. मात्र समाजाने घालून दिलेल्या काही चुकीच्या बंधनांमुळे या विषयावर इतर विषयांप्रमाणे सार्वजनिक चर्चा केली जात नाही. त्यामुळे सेक्सबाबत योग्य माहिती मिळण्यापासून अनेकांना वंचित राहावे लागते. साहजिकच यामुळे अनेकांना चुकीची माहिती घेऊन पुढे जावे लागते. याचा परिणाम म्हणून मग सेक्सबाबत अनेक गैरसमज समाजात निर्माण होतात. आणि त्यातून अनेकांना गंभीर आजारांना सुद्धा सामोरे जावे लागते. आणि म्हणून सेक्सबाबत योग्य माहिती आपल्याकडे असणे फार गरजेचे आहे.

आता हळूहळू सेक्सबाबातचे गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच काही महत्वाच्या गोष्टींचा स्विकार सुद्धा केला जातो आहे. त्यातूनच सेक्स करताना आता मोठ्या प्रमाणात कंडोमचा वापर केला जातो. मात्र कंडोमचा वापर केला म्हणजे झालं असा अनेकांचा समज आहे. हा समज पूर्णत: चुकीचा आहे. सेक्स करताना तसेच सेक्स करण्याअगोदर आणि सेक्स केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. अन्यथा अनेक सेक्स संबधित आजारांना सामोरे जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. विशेषत: महिलांनी याबाबत काळजी घेणे फार गरजेचे आहे. याबाबतच आम्ही तुम्हाला या लेखात काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

सेक्स करण्याअगोदर तसेच सेक्स करताना आणि सेक्स केल्यानंतर महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा महिलांना सेक्स संबधित अनेक आजार जडू शकतात. परिणामी सेक्सचा आनंद घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. त्यासोबत शारिरीक आणि मानसिककदृष्ट्या कमकुवतपणाचा सुद्धा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सेक्सनंतर महिलांनी काही गोष्टी करणे टाळले पाहिजे. कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते? जाणून घेऊया सविस्तर.

अनेकांना सेक्स नंतर प्रचंड थकवा येतो. त्यामुळे अंथरुणावरुन उठण्याची इच्छा होत नाही. बर्‍याचदा सेक्सनंतर थकवा जाणवत असल्यामुळे लगेच झोप लागते. परंतू असे केल्यास त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. सेक्स करताना वापरलेले कपडे घालून झोपणे टाळले पाहिजे. सेक्स करताना आपल्या शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. त्यामुळे सेक्स करताना शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो. घामाने भिजलेले कपडे किंवा घामाने भिजलेल्या जागेवर झोपल्याने त्वचेचे आजार जडू शकतात. त्यामुळे सेक्स दरम्यान वापरलेल्या कपड्यावर झोपणे टाळावे तसेच सेक्स दरम्यान वापरलेले कपडे स्वच्छ धुवून काढावे व त्यानंतर ते वापरात घ्यावे.

सेक्स झाल्यानंतर योनी मार्ग स्वच्छ करणे जरुरी आहे. परंतू योनी मार्ग स्वच्छ करत असताना काळजी घेणे फार गरजेचे आहे. अनेक महिलांना योनी मार्ग स्वच्छ करण्यासाठी वेट वाईप्स वापरण्याची सवय असते. मात्र वेट वाईप्समुळे तुम्हाला काही दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच अनेक महिला योनी स्वच्छ करण्यासाठी साबण वापरतात. परंतू साबण वापरल्याने सुद्धा योनी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. योनीचा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतो. त्यामुळे योनी स्वच्छ करण्यासाठी वेट वाईप्स किंवा साबण वापरल्यास जळजळ होणे किंवा ईन्फेंक्शन होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मोठ्या शहरांमध्ये अनेकांच्या घरात आंघोळीसाठी बाथटब वापरला जातो. त्यामुळे अशा घरातील महिला सेक्स झाल्यानंतर रिलॅक्स वाटावं याकरता बाथटबमध्ये जास्तीत जास्त वेळ बसून राहतात. मात्र असे करणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. सेक्स झाल्यानंतर स्वच्छ आंघोळ करणे चांगलेच आहे. परंतू पुष्कळ वेळपर्यंत बाथटबमध्ये बसणे चुकीचे आहे. सेक्समुळे महिलांचा योनी मार्ग काहीसा उघडतो. अशावेळी बाथटबमध्ये जास्त काळ बसल्यास योनीमध्ये जिवजंतू प्रवेश करुन ईन्फेक्शन होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे सेक्स झाल्यानंतर बाथटबमध्ये जास्त वेळ बसणे टाळले पाहिजे.

सेक्स झाल्यानंतर थकवा येत असल्यामुळे अनेकजण अंथरुणालाच खिळून राहतात. अशावेळी त्यांना लघवी आली किंवा तहान लागली तरी ते उठून जाऊन लघवी करण्याचं किंवा पाणी पिण्याचा कंटाळा करतात. मात्र ही चुक अंगलट येऊ शकते. सेक्स झाल्यानंतर लघवी आल्यास कधीच रोखून धरु नये. कारण लघवीतून आपल्या शरीरातील जिवजंतू तसेच अनावाश्यक घटक बाहेर पडतात. त्यामुळे सेक्सदरम्यान आपल्या शरीरात निर्माण झालेल्या काही अनावश्यक घटकांना शरीराबाहेर टाकणे फार जरुरीचे असते. त्यामुळे सेक्स झाल्यानंतर लघवीला जाणे कधीच टाळू नये.

हे देखील वाचा Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..

Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..

Celebrity Sex Life: या कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

Tata Nexon: आता Tata Nexon मिळतेय दोन लाखांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.