आमदारांच्या मागे नेमक लागलय तरी काय? शिंदे समर्थक अजून एका आमदाराचा अपघात..
Bacchu Kadu: काही दिवसांपूर्वी भाजपचे मान खटाव विधानसभा आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला. त्यांची गाडी पुलावरून नदीत कोसळून अपघात घडला. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला देखील भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये धनंजय मुंडे जखमी झाले होते. त्यानंतर रामदास कदम यांचे सुपुत्र आणि नुकतेच शिंदे गटामध्ये प्रवेश केलेले आमदार योगेश कदम यांचा देखील भीषण अपघात झाला. या अपघातातून हे तीनही आमदार बचावले. परंतु आता अवघ्या एका महिनाभरातच चौथ्या आमदाराचा अपघात झाला आहे.
प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडत असताना (Bacchu Kadu Accident) अपघात झाल्याची घटना घडली आहे. आमदार बच्चू कडू यांना अमरावतीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मार लागला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. हा अपघात आज सकाळी घडला आहे. बच्चू कडू आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला आहे.
बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने आमदार बच्चू कडू यांना धडक दिली. दुचाकीने धडक दिल्याने ते रस्ता विभाजकाला (Road divider) धडकले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्या डोक्याला 4 टाके पडले असून त्यांच्या पायाला देखील दुखापत झाली आसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या अपघातामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या अपघातामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परंतु डॉक्टरांनी बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे देखील सांगितले आहे.
अवघ्या महिनाभरात 4 आमदारांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अगोदर काही महिन्यांपूर्वी शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विधान परिषदेचे आमदार, मराठा नेते विनायक मेटे यांना अपघातामुळे प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मध्यंतरी आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला. चालकाला पुलाचा अंदाज न आल्यामुळे गाडी फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. यामध्ये गोरे यांना गंभीर दुखापत झाली होती. सध्या ते उपचार घेत आहेत.
हेही वाचा: मोठी बातमी! पुन्हा एकदा एका आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर; एवढंच नव्हे तर..
Acharya Chanakya: पत्नीमध्ये हे चार गुण असतील तर यश तुमच्या पायाशी घालते लोटांगण..
Acharya Chanakya: पत्नीमध्ये हे चार गुण असतील तर यश तुमच्या पायाशी घालते लोटांगण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम