मोठी बातमी! पुन्हा एकदा एका आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर; एवढंच नव्हे तर..

0

दोनच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला ( Dhanjay Munde Health Update) अपघात झाला होता. अशातच आता पुन्हा एक अपघात झाल्याचं समोर आलं आहे. रात्री मतदारसंघातील कामे आटपून धनंजय मुंडे आपल्या निवासस्थानी जात असताना रात्री उशीरा त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात कसलीही जीवित हानी झाली नसली तरी धनंजय मुंडे यांना जबर मार लागला आहे. त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यांच्या छातीला दुखापत झाली होती. या अपघातातून धनंजय मुंडे हे बचावले असले तरी त्यांच्या गाडीचे खूप मोठे नुकसान झाले. आता असाच अपघात रामदास कदम यांच्या मुलाचाही झाला आहे.

शिंदे गटाचे विधानसभेचे आमदार आणि रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्या गाडीला भीषण (Yogesh Kadam Car Accident) अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा शुक्रवारी रात्री 10 च्या दरम्यान भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर नजीक असणाऱ्या कशेडी घाटात चोळई येथे अपघात घडला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) बचावले आहेत. परंतु कदम यांच्या वाहन चालकाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) हे खेडवरून मुंबईसाठी निघाले होते. कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे पाठीमागून येणाऱ्या टँकरने आमदार योगेश कदम यांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली. गाडीला धडक दिल्यामुळे टँकर पलटी झाला. हा अपघात घडल्यानंतर टँकर चालक पसार झाल्याची माहिती मिळाली. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीवर आदळली. पाठीमागून टक्कर दिल्याने कदम यांच्या गाडीचा पाठीमागून चक्काचूर झाला आहे. या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. आमदार कदम आणि त्यांचे चालक यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आहे आहे. आमदार योगेश कदम यांना किरकोळ मार लागला असला तरीदेखील त्यांच्या ड्रायव्हरला दुखापत झाली आहे.

योगेश कदम कोण आहेत?

मध्यंतरी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले होते. त्यातील एक आमदार म्हणजे योगेश कदम होय. शिवसेनेचे एकेकाळचे फायर ब्रॅण्ड नेते, मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेल्या रामदास कदम यांचे ते सुपुत्र आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्या पराभव करत योगेश कदम विजयी ठरले होते. शिवसेनेतीलच स्थानिक विरोध झुगारून उद्धव ठाकरे यांनी योगेश कदम यांना विधानसभेचे तिकीट दिले होते.

हेही वाचा: Dhananjay Munde Accident: धनंजय मुंडेंचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर; छाती दोन जाग्यावर फ्रॅक्चर; पाहा व्हिडिओ..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

Tata Nexon: आता Tata Nexon मिळतेय दोन लाखांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Goutam Adani Vs Elon Musk: अवघ्या एका महिन्यात अदानी एलोन मस्कचा उठवणार बाजार, मस्कला ट्विटर भोवले 

Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.