Lionel Messi: मेस्सीचं ‘पुणे कनेक्शन’ आहे खूपच खास; मेस्सीचे आजी-आजोबा पुण्यात करत होते हा व्यवसाय..
Lionel Messi: रविवारी कतारमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्स (Argentina vs France) यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या फिफा वर्ल्ड कप फायनल (FIFA World Cup final 2022) सामन्यात अर्जेंटिना फ्रान्सचा पेनाल्टी शूटमध्ये पराभव करत विश्वचषक विजेता बनला. (Argentina world champion) या विजयात महान फुटबॉलपटू मेस्सीने (Lionel Messi) महत्त्वाची कामगिरी पार पाडली. करोडो फुटबॉल चाहत्यांनी मेस्सीने वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा होती. दोन दिवस उलटूनही जगभरात या विजयाची चर्चा रंगत आहे. यातच मेस्सीच्या जन्मस्थळावरून देखील सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या नेत्याने मेस्सीचा जन्म हा आसाममध्ये झाला असल्याचा ट्विट केल्यानंतर, सोशल मीडियावर अर्जेंटिनाचा कॅप्टन मेस्सीच्या (Argentina captain Lionel Messi) जन्मस्थळावरून तुफान मीन्स (social media memes) बनवण्यात आले. या मीन्समध्ये मेस्सीचा पुण्याशी थेट संबंध जोडला गेला. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान वायरस झाली आहे. अर्जेंटिनाचा कॅप्टन मेस्सीचा खूप मोठा चाहता वर्ग भारतात देखील असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारतीय लोक देखील प्रचंड आनंदी असल्याचं दिसून आलं.
मेस्सी मुळचा पुण्याचा असल्याचा थेट संबंध जोडण्यात आला. मेसेजचा जन्म हा पुण्यात झाल्याचं मीन्स बनवताना सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली. जी वाचून तुम्ही देखील हसून लोटपोट होऊन जाल. यामध्ये सांगण्यात आलं, मेस्सीचे आजी आणि आजोबा हे पुणेकर होते. पुण्यात ते आपला ‘मेस’ हा व्यवसाय सांभाळत होते. पुण्यात हा व्यवसाय सांभाळताना त्यांनी नंतर अर्जेंटिनामध्ये आपला व्यवसायाला चालना दिली. आणि त्यात त्यांचं आडनाव मेस्सी करून घेतलं. पुढे त्यांचा नातू फुटबॉलपटू झाला, तोच आताचा मेस्सी म्हणून ओळखला जातो, असं सांगण्यात आलं.
याशिवाय मेस्सीचा जन्म डोंबिवलीत झाला, असं देखील एक मिम्स बनवण्यात आले आहे. मेस्सीचा जन्म डोंबिवलीत कसा झाला, याचे स्पष्टीकरण देताना खूपच मजेशीर पोस्ट करण्यात आली आहे. जी वाचल्यानंतर तुम्ही देखील या क्रिएटिविटीला सलाम ठोकाल. मेस्सी हा मूळचा नेतीवली, कल्याण पूर्व, ठाण्याचा आहे.
त्यांच्या पूर्वजांचे आडनाव हे “श्री म्हात्रे आणि सौ म्हात्रे” असं होतं. लग्ना अगोदरचं आडनाव हे चौधरी होतं. या दोन्ही आडनावांमधील M आणि C हे आडनाव घेण्यात आलं. वयोवृद्ध मंडळींना एमसी असं बरोबर उच्चारता येत नव्हतं. त्यामुळे ते त्यांना मेस्सी-मेस्सी अशी हाक मारत होते. त्यानेच काल फिफा वर्ल्डकप अर्जेंटिनाला जिंकून दिला. असं जोरदार मिम्स बनवण्यात आले आहे.
आसाम काँग्रेसचे नेता आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करताना मेसीचा जन्म हा आसाममध्ये झाल्याचे म्हटलं. काही वेळानंतर, त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरचे ट्विट डिलीट देखील केलं. मात्र तोपर्यंत नेटकऱ्यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करताना खूप मोठ्या प्रमाणात मीन्स बनवले. देशभर मेस्सीच्या जन्मस्थळावरून मीन्स बनवण्यात आल्यानंतर, महाराष्ट्रात देखील या मिम्सने जोर धरला.
हे देखील वाचाRohit Sharma and Rahul Dravid: कर्णधार पदानंतर रोहित शर्माची T-20 संघातूनही हकालपट्टी; राहुल द्रविडही T-20 मधून आऊट..
FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..
Chanakya Niti: हे चार गुण तुमच्याकडे असतील तर समाज करतो मुजरा..
Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम