Intelligence Bureau Recruitment: १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी बंपर भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..
Intelligence Bureau Recruitment: देशात बेरोजगारी (unemployment) प्रचंड वाढली असल्यामुळे आता नोकरी (job) मिळवणं प्रत्येकासमोर खूप मोठं आव्हान आहे. बेरोजगारी बरोबरच महागाई (inflation) देखील प्रचंड वाढली असल्याने आता उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारा खर्च देखील वाढला आहे. साहजिकच यामुळे सर्वसामान्य कुटुंबातल्या किमान एका तरी सदस्याला नोकरी (nokari) असणं फार आवश्यक आहे. अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असले तरी उमेदवारांची संख्या कैकपटीने जास्त येत असल्याने प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. ही वस्तुस्थिती असली तरी देखील तुम्हाला जिथे जिथे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, तिथे जाणं गरजेचं आहे.
जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. भारतीय गुप्तचर विभागमध्ये (Intelligence Bureau) अंतर्गत सुरक्षा सहाय्यक (Security Assistant) कर्मचारी त्याचबरोबर कार्यकारी मल्टी-टास्किंग स्टाफ (Executive multi-tasking staff) या रिक्त पदांसाठी तब्बल 1671 जागा भरण्यात येणार आहेत. या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली असून, पात्र आणि इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. 25 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आली असून, अर्ज हे ऑनलाईन स्वरूपात मागवण्यात आले आहेत.
भारतीय गुप्तचर विभागाअंतर्गत सुरक्षा सहाय्यक कर्मचारी त्याचबरोबर कार्यकारी तसेच मल्टी-टास्किंग स्टाफ या रिक्त पदांसाठी तब्बल 1671 जागांसाठी शैक्षणिक पात्रता ही विविध पदासाठी वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. सुरक्षा सहाय्यक तसेच कार्यकारी या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर ज्या राज्यातून उमेदवाराने अर्ज सादर केला आहेत, त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र देखील जोडणे आवश्यक आहे. सोबतच संबंधित स्थानिक भाषा येणे देखील महत्वाचे आहे. महत्वाचं म्हणजे, उमेदवारांना आपल्या इंटेलिजन्स कार्याचा फील्डवरचा अनुभव असणे देखील महत्वाचे आहे. मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल या पदासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांचे शिक्षण हे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे, त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र देखील उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिक भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि परीक्षा फी
भारतीय गुप्तचर विभागाअंतर्गत सुरक्षा सहाय्यक कर्मचारी त्याचबरोबर कार्यकारी तसेच मल्टी-टास्किंग स्टाफ या रिक्त पदांसाठी भरण्यात येणाऱ्या एकूण तब्बल 1671 रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) या पदासाठी उमेदवारांचे वय 27 ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी उमेदवारांचे वय हे 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. भारतीय गुप्तचर विभागाअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागांसाठी उमेदवारांना 450 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
भारतीय गुप्तचर विभागाअंतर्गत सुरक्षा सहाय्यक कर्मचारी त्याचबरोबर कार्यकारी तसेच मल्टी-टास्किंग स्टाफ या रिक्त पदांसाठी भरण्यात येणाऱ्या तब्बल 1671 रिक्त जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.mha.gov.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे. https://www.mha.gov.in/ असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यांनतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
हे देखील वाचाElectric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Married life tips: वैवाहिक जीवनातल्या या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा व्हाल बर्बाद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम