INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..

0

INDvSA: गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या (Guwahati) दुसऱ्या T-20 (2nd T20) सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघडी घेत मालिका विजय देखील साकारला. (India beat South Africa by sixteen runs) दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. (South Africa elected to field) प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या भारतीय संघाने अक्षरशः दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची पळताभुई केली. पहिल्या T20 सामन्यांत संथ खेळामुळे केएल राहुलवर ( KL Rahul) खूप मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात राहुलने वादळी खेळी साकारत टीकाकारांचे तोंड बंद केले.

सलामवीर केएल राहुलने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत 28 चेंडूत 57 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत केएल राहुलने तब्बल 4 उत्तुंग षटकार आणि पाच खणखनीत चौकार लगावले. 11.3 षटकात संघाची धावसंख्या 107 असताना केशव महाराजने पायचीत करत धोकादायक ठरणाऱ्या राहुलचा अडथळा दूर केला.

दोन्हीं सलामीवीर बाद झाल्यानंतर, सूर्यकुमार कुमार यादव (suryakumar Yadav) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) यांनी डावाची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 102 धावांची भागीदारी केली. यादवने केवळ 22 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी केली या खेळीत पाच षटकार आणि पाच चौकराचा समावेश होता.

सूर्यकुमार यादवला विराटने देखील चांगली साथ दिली. 28 चेंडूत 49 धावांची नाबाद खेळी करत विराटने काही आकर्षक फटाके मारले. या खेळीत विराटने 1 षटकार आणि सात चौकार लगावले. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. धावांचा डोंगर उभा केल्यानंतर, भारताची सुरुवात देखील दमदार झाली. अर्शदीपने आपल्या पहिल्याच षटकात साऊथ आफ्रिकेचा कर्णधार बवूमा आणि डावखुऱ्या रुसोला बाद केले. केवळ एका धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेने दोन प्रमुख फलंदाजांना गमावले.

सहाजिकच यामुळे भारत हा सामना सहज जिंकेल, असं वाटत होतं. मात्र क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि मिलर (David Miller) या दोघांनी दक्षिण आफ्रिकेला सामना जवळपास जिंकून दिला. या दोघांनी तब्बल 174 धावांची भागीदारी करत भारताला काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवले होते. डावखुऱ्या डेविड मिलरने 47 चेंडूत 107 धावांची वादळी खेळी केली, तर त्याला डीकॉकने 48 चेंडू 69 धावा करत चांगले योगदान दिले.

हा सामना भारताने 16 धावांनी जिंकला असला, तरी हा सामना आणखी काही कारणांमुळे चर्चेत राहिला. केएल राहुल फलंदाजी करत असताना, केल राहुलच्या जवळून एक साप गेल्याची घटना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मैदानात साप निघाल्याने या घटनेची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये साप नक्की आला कुठून? यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मैदानामध्ये फिल्डिंग करणाऱ्या एखाद्या खेळाडूला हा साप चावला असता तर मोठा अनर्थ झाला असता. असं देखील चाहते म्हणताना पाहायला मिळत आहेत.

कुठून आला साप

भारताचा सलामिवीर केएल राहुल फलंदाजी करत असताना, त्याच्या जवळून साप मैदानाबाहेर जाताणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मैदानात हा साप नक्की आला कुठून? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गुवाहाटीमध्ये पावसाचं वातावरण असल्याने, अशा वातावरणामध्ये सरपटणारे प्राणी आपल्या बिळातून बाहेर निघतात. प्रचंड हुमिडिटी असल्याने साप बाहेर निघाला असावा, असं बोललं जात आहे. अचानक मैदानामध्ये साप निघाल्याने काही वेळ सामना देखील रोखण्यात आला होता. मात्र काही वेळाने साप गेल्यानंतर, सामना पुन्हा सुरू झाला. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.

हे देखील वाचा 

INDvSA: युवराज प्रमाणे रोहितलाही आहे कॅन्सर; सामन्यांत रोहितच्या नाकातून अचानक येऊ लागले रक्त, पाहा व्हिडिओ..

Women rights: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना गर्भपात करण्याचा दिला पूर्ण अधिकार..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.