Internet data:अचानक डाटा संपला? चिंता करू नका, हा नंबर डायल करा मिळेल अनलिमिटेड डाटा..
Internet data: अलीकडच्या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक महागडे स्मार्टफोन (smartphone) खरेदी करून अनेकजण आपला आवडता छंद जोपासण्याचे काम करत असतात. एखाद्या दिवशी निवांत घरी असताना आपला आवडता चित्रपट पाहण्याचे काम देखील अनेक जण करत असतात. OTT प्लॅटफॉर्मच्या (OTT platform) जमान्यात आता अनेक दर्जेदार वेब सिरीज (web series) येत असल्याने, अनेक जण वेब सिरीज पाहणं देखील पसंत करतात. साहजिकच यामुळे १.५gb डाटा प्लॅन (data plan) असणाऱ्यांचा डाटा लगेच संपून देखील जातो. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल.
इंटरनेट शिवाय स्मार्टफोन एक काड्याची पेटी आहे, आपण असंही म्हणू शकतो. स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण जे काही करतो, ते करण्यासाठी अर्थातच इंटरनेट डाटा आवश्यक असतो. साहजिकच यामुळे दिवसभरासाठी मिळणारा दीड किंवा दोन जीबी डाटा संपने हे स्वाभाविक आहे. व्हाट्सअप चॅटिंग असो की व्हिडिओ कॉल यासाठी डाटा खर्च होत असतो. स्मार्टफोन मधल्या साध्या-साध्या गोष्टी करण्यासाठी देखील आपल्याला डाटा खर्चावा लागतो. त्यात एखादा चित्रपट पाहायचा म्हटल्यावर, तर हमकास डाटा संपतोच संपतो. अशावेळी आपल्याला रिचार्ज केल्याशिवाय पर्याय नसतो. मात्र अनेकांच्या अकाउंटमध्ये पैसे नसल्याने पंचायत होते. मात्र आता या अनेक समस्यांवर टेलिकॉम कंपन्यांनी पर्याय दिला आहे.
अचानक तुमचा डाटा संपला आणि जर रिचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील, तर तुम्ही कोणाचं तरी हॉटस्पॉट घेऊन काम चालवता. मात्र जवळ कोणीही नसेल, तर मात्र तुम्हाला महागडा स्मार्टफोन देखील काही उपयोगाचा वाटत नाही. डाटा नसेल, तर महागडा स्मार्टफोन देखील खुळखुळा होतो. ही समस्या अनेकांना जाणवत असल्याने, आता टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना ‘डाटा’ लोन म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.
अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना डाटा हा लोन म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभराचा डाटा प्लॅन संपला असला तरी देखील आता तुम्हाला इमर्जन्सी डाटा लोन घेता येणार आहे. एअरटेल (Airtel) देखील आपल्या ग्राहकांना डाटा लोन प्रोव्हाइड करत आहे. एअरटेलचा डाटा लोन मिळवण्यासाठी खूप सोपी ट्रिक ग्राहकांना वापरायची आहे. आपल्या ग्राहकांना आता एअरटेल ‘डेटा कर्ज’ देते. हे डेटा कर्ज ग्राहकांना मिळवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? आता हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊ.
या सोप्या पद्धतीने मिळवा डाटा
जर तुमचा अचानक डाटा संपला असेल, आणि तुमच्याकडे रिचार्ज करण्यासाठी कोणतेही पर्याय उपलब्ध नसतील तर तुम्ही डाटा लोन घेऊ शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील फोन कॉलवर जावं लागणार आहे. फोन कॉलवर गेल्यानंतर तुम्हाला एक नंबर डायल करायचा आहे, हा नंबर डायल केल्यानंतर, पुढची प्रोसेस पूर्ण करून एअरटेलचा डाटा लोणच्या स्वरूपात मिळवता येणार आहे. कोणता आहे तो नंबर? आणि डाटा मिळण्यासाठी प्रोसेस कशी करायची? तर तुम्हाला *141*567# हा नंबर डायल करावा लागणार आहे.
तुमच्या फोन कॉल मधून तुम्ही *141*567# हा नंबर डायल केल्यानंतर, तुम्हाला एअरटेलचे नेटवर्क दिसणार आहे. आता तुमचं नेटवर्क 2G, 3G की ‘फोर’जी आहे. तपासायचे आहे. जे नेटवर्क तुमचं असेल, ते नेटवर्क तुम्ही निवडल्यानंतर, तुम्हाला कंपनी डाटा लोनच्या स्वरूपात देते. याशिवाय लोन मिळवण्यासाठी आणखी एक पर्याय ग्राहकांना देण्यात आला आहे. तुमच्या फोन कॉलमधून तुम्ही 52141 हा नंबर डायल करून पुढील सूचनांचे पालन करून देखील डाटा लोनच्या स्वरूपात मिळूवू शकता.
हे देखील वाचाDriving licence: आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ऑफिसला जायची गरज नाही; असा करा ऑनलाईन अर्ज 7 दिवसांत मिळेल घरपोच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.