Women and Child Development: महिला व बाल विकास विभागात मेगा भरती! बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी…

0

Women and Child Development: बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचबरोबर महागाईने देखील उच्चांक गाठला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना सरकार मात्र देशात महागाईच नाही असं म्हणत आहे. केंद्र सरकारने नुकताच संसदेत बेरोजगारी संदर्भातला आकडा जाहीर केला. यामध्ये २०१४ पासून एकूण २२ कोटी तरुणांनी अर्ज केले होते. यामध्ये केवळ सात लाख २० हजार तरुणांना नोकरी मिळाली. यावरून देशात किती बेरोजगारी आहे, याचा अंदाज लावता येऊ शकतो. एकीकडे अशी स्थिती असल्याने सध्याच्या काळात नोकरी मिळवले, खूप मोठे आव्हान आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विभागाने काही रिक्त पदांची भरती आयोजित केली आहे. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, संरक्षण अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, यासह अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या संदर्भातली अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना १९ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. आता आपण या भरती संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्व प्रथम आपण कोणकोणत्या पदांसाठी किती रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, याविषयी जाणून घेऊ.

या पदांसाठी केली जाणार भरती

महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विभागाकडून एकूण १९५ जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. १९५ जागा ह्या अकरा विभागात भरण्यात येणार आहेत. आता आपण 195 जागा कोणकोणत्या अकरा विभागात भरण्यात येणार आहेत, हे जाणून घेऊ. संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, आउटरीच वर्कर, कायदेशीर-सह परीवीक्षा अधिकारी, समुपदेश सामाजिक कार्यकर्ता, लेखपाल, डेटा विश्लेषण, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, डेटा एन्ट्रीऑपरेटर, अशा एकूण अकरा विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या नोकर भरती संदर्भात उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय ठेवण्यात आली आहे, याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ. अकरा विभागात 195 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. मात्र या सर्व पदांसाठी वयोमर्यादा एकच ठेवण्यात आली आहे. वयोमर्याचा विचार करायचा झाला, तर उमेदवारांचे १८ ते ४३ वय ठेवण्यात आले आहे.

आता आपण कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे, हे डिटेल्स मध्ये जाणून घेऊ. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही, ‘सोशल वर्क’ या विषयात पदवी संपादन करणे आवश्यक आहे. कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, या पदासाठी LLB म्हणजेच, वकीलीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. वकिलीचे शिक्षण हे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच घेणे आवश्यक आहे. संरक्षण अधिकारी या पदासाठी, Social Work या विषयात ‘Institution Care Post Graduate’ चे शिक्षण घेणे आवश्यक आहे. समुपदेशक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ‘Social Work’ या विषयात पदवी संपादन केलेली असणं आवश्यक आहे.

‘लेखापाल’ या पदासाठी उमेदवाराचे ‘commerce’ मधून ‘Graduate’ होणे आवश्यक आहे. ‘सामाजिक कार्यकर्ता’ या पदासाठी B.A या शाखेतून Graduate होणे आवश्यक आहे. डेटा विश्लेषक या पदासाठी कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापठातून गणित, अर्थशास्त्र, BCA, या शाखेतून Graduation होणे आवश्यक आहे. ‘सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर’ या पदासाठी कोणत्याही मान्याप्राप्त बोर्डतून 12th pass होणे आवश्यक आहे. सोबतच कोणताही Computer चा Diploma होणे आवश्यक आहे. आउटरीच वर्कर या पदासाठी उमेदवाराचे 12th चे शिक्षण कोणतीही मान्यताप्राप्त बोर्डमधून झालेले असावे. सोबतच संभाषण कौशल्य आणि बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणे आवश्यक आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज 

महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विभागाकडून करण्यात येणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १९ ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.wcdcommpune.com असं सर्च करणे आवश्यक आहे. यानंतर तुमच्यासमोर राज्य महिला व बाल कल्याण विभागाची website ओपन होईल. तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, या भरतीसाठी अर्ज करू शकता. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Swastika Sign: मुख्य प्रवेशद्वार, लग्न, महत्त्वाच्या समारंभात स्वस्तिक का काढले जाते? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Work From home side effect: वर्क फ्रॉम होम मुळे मानसिक आरोग्यावर होतायत हे तीन गंभीर परिणाम..

Skin Care Tips: नियमित कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवल्यास होतात हे आश्चर्यकारक फायदे..

Kitchen tips: हिरवे झालेले बटाटे खात असाल, तर सावधान! होतायत हे गंभीर आजार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.