Rajat patidar: यापेक्षा सुंदर खेळी मी माझ्या आयुष्यात अजूनही पाहिली नाही; आणखी काय म्हणाला विराट? रजतनेही दिलं झणझणीत उत्तर..
Rajat patidar: ईडन गार्डनच्या मैदानावर (Eden garden) खेळल्या गेलेल्या कालच्या आयपीएलच्या २०२२ (IPL 2022) एलिमिनेटर (eliminator) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनऊ संघाचा पराभूत करत (Royal Challenger Bangalore beat Lucknow super giant) क्वालिफाय2 (qualifier2) मध्ये प्रवेश केला. चित्तथरारक लढतीत बंगलोरने 14 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती रजत पाटीदारची (Rajat patidar) महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर संघाचा कर्णधार पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारने डावाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली, आणि नाबाद 54 चेंडूत 112 धावांची खेळी केली. रजत पाटीदारच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला 207 धावा करता आल्या.
रॉयल रॉयल चॅलेंजर बंगलोरचे २०८ धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरणाऱ्या लखनऊ संघाची सुरुवात निराशाजनक झाली. लखनऊ संघाचा सलामीवीर पहिल्याच षटकात तंबूत परतला. मात्र कॅप्टन केएल राहुल आणि दीपक हूडा यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने अशक्यप्राय आव्हान उभे केल्याने, हे आव्हान लखनऊ संघाला पेलू शकले नाही. आणि मोक्याच्या क्षणी के एल राहुल बाद झाल्यानंतर, लखनऊ संघ14 धावांनी पराभूत झाला. मात्र या सामन्यात सर्वांनाच मोठा धक्का दिला, तो रजत पाटीदारने.
प्लेऑफमध्ये कुठल्याही भारतीय ‘अन कॅप: प्लेयरने खेळलेली ही सर्वोत्तम खेळी होती. आतापर्यंत प्ले ऑफमध्ये कुठल्याही अनकॅप भारतीय खेळाडूला शतक करता आले नाही, मात्र हा कारनामा रजत पाटीदारने करून दाखवला. विजयानंतर, रजत पाटीदार आणि विराट कोहली यांनी संवाद साधला. या संवादात या खेळीचं रहस्य विराट कोहलीने पाटीदारला विचारलं. याबरोबरच विराट कोहलीने रजतच्या या इनिंगचे तोंड भरून कौतुकही केले.
काय म्हणाला विराट?
मी माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक ऐतिहासिक खेळ्या पाहिल्या आहेत. अनेक खेळाडूंनी दबावात अनेक मोठ्या इनिंग्स खेळल्या आहेत. मात्र रजत पाटीदारने खेळलेल्या इनिंग सारखी इनिंग मी आतापर्यंत कधीही पाहिली नाही. रजत पाटीदार हे नाव भविष्यात अनेक वेळा घेतलं जाईल, यात अजिबात शंका नसल्याचं देखील विराट कोहली म्हणाला. मी देखील दबावात अनेक मोठ्या खेळ्या केल्या आहेत. मात्र रजत पाटीदारने खेळलेली ही इनिंग सर्वोत्तम होती. मी अक्षरशः रजत पाटीदारचा दिवाना झालो आहे. याबरोबरच विराट कोहली म्हणाला, येणाऱ्या दोन सामन्यांत देखील पाटीदार अशाच खेळा करेल.
काय म्हणाला रजत पाटीदार?
रजत पाटीदारने खेळलेल्या रहस्यमय केळीचे रहस्य उघडताना तो म्हणाला, जेव्हा कॅप्टन बाद झाला, तेव्हा मी मैदानात पाऊल ठेवताना माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा विचार नव्हता. मला माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास होता. सुरुवातीला मी काही चेंडू डॉट जरी खेळलो, तरी शेवटी मी कव्हर करू शकतो. सुरुवातीला काही शॉट्स माझ्या बॅटच्या मधोमध लागल्याने, माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. आमच्या सुरुवातीला विकेट गेल्याने, मी अधिक काळ खेळलं पाहिजे, असं मला वाटत होतं. आणि परस्थिती माझ्या बाजूने असल्याने मी ही इनिंग खेळू शकलो.
लिलावात रजत पाटीदारला कोणीही खरेदी केलं नव्हतं
मध्यप्रदेशचा या खेळाडूला आयपीएलच्या या मोसमात कुठल्याही फ्रॅंचाईजने बोली लावली नाही. मेगा ऑक्शन होऊन देखील रजत पाटीदार या हंगामात अनसोल्ड प्लेयर ठरला होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स संघाने केलेला नवनीत सिसोदिया याला दुखापत झाली आणि तो या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्याच्या जाग्यावर रजत पाटीदारला खेळण्याची संधी मिळाली. आणि तो एका रात्रीत स्टार खेळाडू म्हणून उदयास आला.
Home Remedies: हा घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..
Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम