Edible Oil: खाद्यतेलाबाबत मोठी बातमी, शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; खाद्यतेल महागणार की स्वस्त होणार
Edible Oil: आज खर पाहायला गेले तर एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तेलाच्या किंमती वाढलेल्या आहेत. अक्षरशः हे न रुचणार आहे. खाद्यतेल म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. रोज जेवण बनवण्यासाठी खाद्यतेल लागते. खाद्यतेलाचे वाढलेले दर आज अक्षरशः दोनशे रुपयांच्या घरात आहेत. त्यातच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस या सर्वांनी सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. वाढलेल्या प्रचंड महागाईने सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता सरकारने सुर्यफुलाबाबत एक निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया सविस्तर.
कोरोना महामारीमुळे आधीच खूप मोठे नुकसान सर्वांनाच सहन करावे लागले आहे. अजूनही वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या अवाढव्य किमतींमुळे देशात अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. यातच खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये देखील अवाढव्य वाढ झाली असल्याचे पाहायला मिळते. या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचे आर्थिक बजेट ढासळले आहे. त्यामुळे आता लोक देखील हवालदील झाले आहेत. महागाईचा निषेध व्यक्त होत आहे. त्यामुळे आता खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत.
आता लवकरच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसेच आहे. केंद्र सरकारने मंगळवारी मार्च 2024 पर्यंत वार्षिक 2 दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि कृषी उपकर आकराला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. वित्त मंत्रालयाने मंगळवारी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 या वर्षात वार्षिक 20 लाख टन कच्चे सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावर आयात शुल्क आकारले जाणार नाही.
ठराविक मर्यादपर्यंत आयात शुल्क न आकारल्यामुळे देशांतर्गत वस्तूंच्या किंमती कमी होतील, आणि वाढलेली महागाई नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा केंद्र सरकारला विश्वास आहे. दिवसेंदिवस तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आवाक्यात आणण्यासाठी उत्पादन शुल्क कमी केले होते. यासोबतच नुकताच स्टील आणि प्लास्टिक उद्योगात वापरल्या जाणाऱ्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क केंद्र सरकारने हटवले आहे. त्यामुळे घरासाठी लागणाले स्टीलच्या किंमती देखील उतरल्या आहेत.
या निर्णयामुळे 31 मार्च 2024 पर्यंत 8 दशलक्ष टन कच्चे सोयाबीन तेल (Soyabean Oil) आणि कच्चे सूर्यफूल तेल (sunflower oil) विना शुल्क आयात करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन तेलाची किंमत प्रति लिटर 3 रुपयांनी कमी होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र सरकारने 20 लाख टन क्रूड सोयाबीन (Crude Soyabean) आणि सूर्यफूल तेलासाठी (Sunflower oil) शुल्क दर कोटा बाबत अधिसूचना जारी केली आहे. शुल्क दर कोटा अंतर्गत 5.5 टक्के सीमाशुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा हे दोन्ही कर हटवले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे खाद्य तेलाच्या किंमती अवघ्या तीन रुपयाने कमी होणार असल्याने, सर्वसामान्यांची ही केंद्र सरकारने एक प्रकारे उडवलेली थट्टाच आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असल्याने सर्वसामान्यांचे बजेट अक्षरशः कोलमडून गेले आहे. महागाई बरोबरच बेरोजगारी देखील वाढत असल्याने, आता सर्वसामान्यांना पुढे घर कसं चालवायचा, हा मोठा गहन प्रश्न आहे. महागाई आणि बेरोजगारीवरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत, मात्र याचा कसलाही परिणाम केंद्र सरकारला पडत नसल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..
Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम