IPL 2022 Update: क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांवर वादळ आणि पावसाचं सावट; ..तर RCB आणि LSG न खेळताच जाणार बाहेर..
IPL 2022 Update: आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी सामने महाराष्ट्रात खेळवल्यानंतर, आता दोन क्वालिफायर (qualifier) आणि एक एलिमिनेटर (eliminator) सामना कोलकत्याच्या ईडन गार्डनवर (Kolkata Eden garden) खेळविण्यात येणार आहे. सोबतच फायनल (IPL finale) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi cricket stadium Ahmedabad) खेळवण्यात येणार आहे. मात्र आता दोन क्वालीफायर आणि एक एलिमिनेटर सामन्यांवर पावसाचे (rain) आणि वादळाचे संकट असून, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challenger Bangalore) लखनऊ सुपर जॉईंट (Lucknow super giants) तसेच क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल, गुजरात टायटन्स (gujrat Titan) आणि राजस्थान रॉयल (rajsthan royals) या दोन संघाचे काय होणार? पावसाचे सावट लक्षात घेऊन, बीसीसीआयने (BCCI) या सामन्यांसाठी नियमावली तयार केली असून आपण याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.
आयपीएल 2022 (IPL 2022) ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आली असून, चार सामन्यानंतर या स्पर्धेचा विजेता क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. त्यातील तीन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळविण्यात येणार आहेत, तर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र या स्पर्धेमधील तीन सामन्यांवर म्हणजेच दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर सामन्यावर पावसाचे सावट असून, हे तिन्हीं सामने रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे फायनलचा विचार करायचा झाल्यास, फायनलच्या सामन्यावर कुठल्याही प्रकारचं संकट नाही. कारण फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे.
अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात आता प्रश्न आला असेल, कोलकत्तामध्ये होणारे तिन्हीं सामने पावसामुळे रद्द झाले तर, अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचणार? काळजी करू नका, या संदर्भात अगदी सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत. पावसामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणारा एखादा सामना रद्द झाला, तर त्याचा सर्वात मोठा फटका रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला बसणार आहे. पावसाचे सावट लक्षात घेऊन बीसीसीआयने तयार केलेली नवीन नियमावली काय आहे? आता आपण सविस्तर जाणून घेऊ.
राजस्थान आणि गुजरातमधील पहिला क्वालिफायर सामना रद्द झाला तर काय होईल?
कोलकत्तामध्ये येणारे आठ दिवस आणखी वादळ आणि पाऊस असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 24 तारखेला म्हणजेच उद्या राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळविण्यात येणार आहे. सामना सुरू होण्याअगोदरच पाऊस अधिक काळ लागून राहिला, तर बीसीसीआयने ठरवून दिलेल्या नियमानुसार १२:५० मिनिटाच्या आतमध्ये किमान पाच षटकांचा सामना संपवणे आवश्यक आहे. मात्र पाच षटकांचा सामना बारा वाजून पन्नास मिनिटाच्या आतमध्ये संपणार नाही, असं दिसलं तर, बारा वाजून पन्नास मिनिटांनी सुपर ओव्हर खेळून सामन्याचा निकाल लावला जाईल.
मात्र पावसामुळे सुपर ओव्हरही होऊ शकली नाही, तर मात्र साखळी सामन्यात ज्या संघाला अधिक गुण आहेत, तो संघ थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे तर, क्वालिफायर-1 मधील दुसरा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाबरोबर क्वलिफायर-2 खेळणार आहे. म्हणजेच राजस्थान आणि गुजरात यांच्यामधील सामना होऊ शकला नाही, तर गुजरात थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. तर लखनऊ आणि आरसीबी या दोन संघामध्ये जो जिंकेल त्याच्याबरोबर राजस्थान क्वालिफायर 2 सामना खेळणार आहे.
आरसीबी आणि लखनऊ यांचा एलिमिनेटर सामना रद्द झाला तर काय होणार?
आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल, लखनऊ आणि आरसीबी यांच्यामध्ये २५ तारखेला होणारा एलिमिनेटर सामना रद्द झाला तर काय होणार? तर या संदर्भात देखील बीसीसीआयने नियमावली जारी केली आहे. आरसीबी आणि लखनऊ यांच्यामध्ये होणारा एलिमिनेटर सामना देखील पावसामुळे धोक्यात आला, किंवा १२:५० मिनिटाच्या आतमध्ये सामना संपला नाही, तर दोघांमधील विजेता ठरवण्यासाठी १२:५० ला सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. मात्र पावसामुळे सुपर ओव्हरही होऊ शकली नाही, तर मात्र साखळी सामन्याच्या गुणतक्त्याच्या आधारे विजेता संघ घोषित करण्यात येईल. याचा अर्थ लखनऊ संघ विजयी होईल, आणि आरसीबीला आपला गाशा गुंडाळावा लागेल. आणि लखनऊ संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान संघाशी दोन हात करावे लागतील.
जर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ यांच्यात क्वालिफायर२ सामना रद्द झाला तर काय होणार?
सत्तावीस तारखेला समजा राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ यांच्यामध्ये क्वालिफायर-२ सामना खेळविण्यात आला, आणि पावसामुळे हा सामना देखील रद्द झाला, तर काय होईल? असा देखील अनेकांना प्रश्न पडला असेल. तर या सामन्यात देखील पाऊस आला आणि क्वालिफायर-२ हा सामना रद्द झाला तर, साखळी सामन्यातील गुणतक्ताच्या आधारावर राजस्थान रॉयल्स संघ फायनलमध्ये प्रवेश करेल, तर लखनऊ संघाला आपला गाशा गुंडाळावा लागेल.
Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम