LPG GAS SUBSIDY: फक्त याच गॅस धारकांना मिळणार २०० रूपये अनुदान; तुम्हीही घेऊ शकता लाभ, अशी करा नोंदणी..
LPG GAS SUBSIDY: गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य मध्यवर्गीय लोकांचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे. केंद्र शासन आता ‘पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या’ अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर अनुदान देणार आहे. असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आता उज्वला योजनेतील प्रत्येक सिलिंडरला 200 रुपयांचे अनुदान या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य व आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
‘पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एका वर्षात 12 सिलिंडर दिले जातात. सध्या एलपीजी सिलिंडरचे दर 1000 रुपयाच्या पुढे गेले आहेत. केंद्र सरकार एलपीजीवर जे अनुदान देणार आहे त्यामुळे सहाय्यतेमुळं ग्राहकांना एलपीजी सिलिंडर 800 रुपयांत मिळणार आहे. केंद्र सरकारने या आधी एलपीजीवरील अनुदान बंद केले होते. आता पुन्हा अनुदान चालू केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. एलपीजीवरील अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे ज्या महिला वाढलेल्या एलपीजी दरामुळे गॅस कनेक्शन असून देखील चुलीवर स्वयंपाक करत होत्या. त्या महिला आता पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरचा वापर करतील.
पंतप्रधान उज्जला योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक उत्पन्न विशिष्ट निकषापेक्षा कमी असलेल्या महिलांना योजनेतंर्गत मोफत गॅसचं कनेक्शन देण्यात येते. सुरुवातीच्या काळात माफक किंमतीत एलपीजी सिलिंडर उपलब्ध केले जात होते. परंतु कोविडच्या महामारीत एलपीजीवरील अनुदान केंद्र सरकारने बंद केले होते. आता पुन्हा उज्वला योजने अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांना सिलिंडरला 200 रुपये अनुदान मिळणार आहे.
असे अनुदान तपासा
सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल ब्राऊजरवर जाऊन www.mylpg.in या वेबसाईट वर जा. आता तुम्हाला स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला वेगवेगळे सिलेंडर कंपनीचे पर्याय दिसतील. तुमच्याकडे ज्या कंपनीचा सिलिंडर आहे त्या कंपनीच्या नावावर क्लिक करा. जर तुम्ही नवीन यूजर असाल तर, तुम्हाला खाते काढावे लागेल, त्यासाठी तुम्हाला साइन अप या पर्यायावर क्लिक करा. जर तुमचा लॉगीन आयडी तुम्ही यापूर्वीच तयार केला असल्यास, साईन-इन या पर्यायावर क्लिक करा. जर तुमच्याकडे आयडी नसेल, तर पुन्हा नव्याने बनवू शकता. आता तुमच्या नोंदणीनंतर ‘सिलिंडर बुकिंग पहा’ वर क्लिक करा. तुमची सिलिंडर संख्या व अनुदान याचा तपशील पहा. जर तुम्हाला सिलिंडर बुकिंग करुनही अनुदान न मिळाल्यास फीडबॅक बटनावर क्लिक करा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी या पद्धतीने करा नोंदणी
जर तुम्ही अजूनही उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागेल. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेचा फॉर्म डाउनलोड करा. तो अर्ज एलपीजी वितरांकडे जाऊन जमा करा. तुम्ही केलेल्या अर्जावर संपूर्ण पत्त्यासह तुमच्या जनधन खात्याचा तपशील असणे बंधनकारक आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर, तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व नंतर तुम्हाला कनेक्शन दिले जाईल.
Ration Card: आता yaलोकांचे रेशन कार्d होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम