Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! ‘IT’ सह ‘या’ क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; ‘असा’ करा अर्ज..
Tata Consultancy Services: कोरोनामुळे अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. याचा सर्वात जास्त फटका आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना बसला. मात्र आता अनेक आयटी कंपन्या नोकर भरती करत असल्याचे, चित्र पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असणारी ‘टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस’ आयटी कंपनीने TCS (Tata Consultancy Services) पदवीधर असणाऱ्या तरुणांसाठी मेगा भरती आणली आहे.
बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असताना ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ यांनी काढलेली ही मेघा भरती आता बेरोजगारांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात ‘आय टी’च्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. अनेक जण बेरोजगार असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे अनेकांना अनेक कंपन्यांनी कामावरून काढून टाकलं. सहाजिकच यामुळे ‘आय’टीत आज बेरोजगारांची संख्या देखील वाढली आहे. मात्र आता नोकरी गमवणाऱ्या आणि फ्रेशर्सना देखील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) ही देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी मानली जाते. आता या आयटी कंपनीने पदवीधर उमेदवारांसाठी 40 हजारांची मेगा भरती करत आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ने (TCS) यासंदर्भात माहिती देताना, म्हटले, 40000 कर्मचार्यांबरोबरच कॅम्पसच्या देखील 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या कंपनीमध्ये सध्या तब्बल 5,92,125 कर्मचारी काम करत असल्याचं समोर आलं आहे. टाटा कन्सल्टन्सीमध्ये BE, BTech, ME, MTech हे पदवीधर उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची काय पात्रता आहे हे जाणून घेऊया..
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये २०१९ ते २०२१ यामध्ये अभियांत्रिकी पदवी घेतलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या विद्यार्थ्यांकडे दहावी, बारावी, डिप्लोमा यामध्ये ” 60% किंवा 6 CGPA असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयाने ऑफर केलेल्या कुठल्याही स्पेशलायझेशन विषयांत B.E./ B.Tech/M.E./ M.Tech/ MCA/ M.Sc असणारे विद्यार्थी या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
आता आपण ‘अॉफ कॅम्पस’ नोकरीसाठी अर्ज कसा करावा हे सविस्तर पाहूया..
सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन, https://nextstep.tcs.com/campus असं सर्च करणे आवश्यक आहे. असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ‘Tata Consultancy Services’ नावाची अधिकृत वेबसाइट ओपन झालेली दिसेल.
यानंतर मुख्यपृष्ठावर, तुम्हाला उमेदवाराची TCS ऑफ कॅम्पस भर्ती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचा सर्वप्रथम आयडी तयार करणे आवश्यक आहे. उमेदवाराचा अर्ज तयार केल्यानंतर, तुम्हाला नवीन वापरकर्त्याने “ड्राइव्हसाठी अर्ज करा” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणं आवश्यक आहे.
इथपर्यंत सगळी प्रोसेस व्यवस्थित केल्यानंतर, तुम्हाला “नोदणी करा” हा पर्याय दिसेल, तुम्हाला बरोबर याच पर्यायावर क्लिक करायचं आहे. “नोदणी करा” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर ‘IT’ श्रेणी निवडा, असा पर्याय दिसेल. तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
तुम्ही ‘IT’ श्रेणी निवडल्यानंतर, जो पर्याय दिसेल या पर्यायावर तुमच्या संदर्भातली सविस्तर माहिती प्रविष्ट करायची आहे. यानंतर तुम्ही भरलेला अर्ज सबमिट करून, ड्राईव्हसाठी अर्ज करा, यावर क्लिक करायचं आहे.
हे देखील वाचा Army Requirement 2022: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मेघा भरती; ‘या पदांसाठी असा करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम