PM Kisan: पीएम किसान योजनेत बदल करण्यात आलेले ‘हे’ दोन नियम जाणून घ्या, अन्यथा हप्ते होतील बंद..

0

PM Kisan: देशातल्या शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दरवर्षी चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचा हप्ता देशातील शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आत्तापर्यंत एकूण दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तर अकरावा हप्ता एप्रिलच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र यापुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं आवश्यक असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारकडून या योजनेसंदर्भात दोन नवीन नियम जारी करण्यात आले असून, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना या दोन्हीं नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे. चला तर मग आपण जाऊन घेऊया, हे दोन नियम काय आहेत? पीएम किसान योजनेसंदर्भातला पहिला नियम म्हणजे, लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. तर दुसरा नियम संबंधित बँक खात्याचा अकाउंट नंबर तुम्हाला आधार कार्डशी लिंक करावा लागणार आहे. जर तुम्ही या दोन्ही नियमांचं पालन केलं नाही, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारा निधी मिळू शकणार नाही.

                  ई-केवायसी कसं करायचं?

यापूर्वी ई-केवायसी कशी करायची? या संदर्भात सविस्तर माहिती दिली होती, जर तुम्ही ती वाचली असेल तर अर्थातच तुम्ही ई-केवायसी केलं असेल. मात्र जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलं नसेल, तर केंद्र सरकारने ऑनलाईन ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या बंद केली आहे. तुमच्या आधारकार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून तुम्ही यापूर्वी स्वतः ई-केवायसी करू शकत होता.

पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देताना लिहिलं आहे, “पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं असून, आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर ओटीपी पाठवून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आता जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊनच, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घ्यावे, ई-केवायसी करण्याची मुदत 31 मे 2022 ठेवण्यात आली आहे”

                eKYC म्हणजे काय?

अनेकांना ई- केवायसी म्हणजे काय प्रकार आहे याविषयी माहिती नाही. याविषयी देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात,  eKYC या शब्दाचा लॉंग फॉर्म Electronic Know your Client. असा आहे. म्हणजेच,  इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहणं असा याचा अर्थ होतो.

बदल करण्यात आलेल्या नियमानुसार, ई-केवायसी कसं करायचं हे आपण पाहिलं, आता आपण बदल करण्यात आलेल्या दुसऱ्या नियमाविषयी जाणून घेऊया..

आधार कार्ड बँक खात्याशी जोडणं बंधनकारक

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण दोन हजार रुपयाचे दहा हप्ते मिळाले आहेत. तर या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 11 वा हप्ता एप्रिल 2022 ते जुलै 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती आहे. मात्र यापुढे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर  ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. सोबतच संबंधित बँकेचे खाते, तुमच्या आधारकार्डशी लिंक करणं देखील बंधनकारक असल्याचं, जाहीर करण्यात आलं आहे.

आणि म्हणून, केंद्र सरकारने बदल केलेल्या नियमानुसार, तुम्हाला या योजनेचा हप्ता ज्या बँकेत येतो, त्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड अकाउंट नंबरशी लिंक करावं लागणार आहे. जर तुमचं संबंधित बँकेशी आधार कार्ड यापूर्वीच लिंक असेल, तर उत्तमच. मात्र याची देखील तपासणी तुम्हाला बँकेत जाऊनच करावी लागणार आहे.

हे देखील वाचा Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर..

फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; तुम्हालाही घेता येणार लाभ, करा..

Viral video: केवळ सात वर्षाच्या लेकरानं तब्बल दहा किलोचे दोन मासे कसे पकडले? दोन मिनिटाचा हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.