Lifestyle: बॉयफ्रेंड सोबत झोपली असताना रंगेहाथ पकडलं बापाने; पुढे जे घडलं ते पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल..
Lifestyle: प्रेम कोणत्याही वयात होतं, प्रेमाला काही वय नसतं. वयोवृद्ध लोकांना देखील नव्याने प्रेम झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकल्या असतील. जसं जास्त वय असणाऱ्या लोकांना नव्याने प्रेम होतं, तसेच कमी वय असणाऱ्यांनाही प्रेम होतं असतं. अशाच एका पंधरा वर्षाच्या मुलीला देखील एका मुलासोबत प्रेम झालं. या नात्यात ती कमालीची खुश होती, मात्र या नात्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले. या संदर्भातली संपूर्ण कहाणी या मुलीनेचे शेअर केली आहे.
कुठल्याही नात्याला वयाची मर्यादा नसते, कुठल्याही वयामध्ये कोणीही रिलेशनशिपमध्ये राहू शकतो. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र वयाचा विचार करून, जर माणसाने पाऊले टाकली नाहीत, तर त्याचे मोठे परिणाम देखील भोगावे लागतात. असाच प्रकार एका पंधरा वर्षाच्या मुलीसोबत घडला आहे. एका मुलाशी आपलं जीवापाड प्रेम असल्याचं ही मुलगी टाईम्स ऑफ इंडियाला आपला अनुभव शेअर करताना सांगत आहे. माझं वय कमी असलं, तरी मला उर्वरित आयुष्य त्याच्या सोबतच घालवायचं असल्याचंही पंधरा वर्षाची मुलगी सांगत आहे.
काय म्हणतेय पंधरा वर्षांची मुलगी
मी माझ्या प्रियकरावर खूप प्रेम करत असून, मला माझे उर्वरित आयुष्य त्याच्यासोबतच घालवायचं आहे.. मी लहान आहे, याची मला जाणीव आहे. मात्र मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. माझे घरच्यांसोबत नाते व्यवस्थित नाही, मला माझे आई-वडील नेहमी शिव्या देत असतात. माझ्या घरच्यांना या रिलेशनशिप विषयी माहिती आहे. एवढेच नाही, तर माझ्या वडिलांनी आम्हांदोघांना एकत्र झोपलेलं देखील पाहिलं आहे. कदाचित यामुळेच माझे आई वडील माझा तिरस्कार करत असतील.
हा सगळा प्रकार माझ्या वडिलांना समजल्यानंतर, त्यांनी माझी शाळा देखील बदलली. एवढेच नाही, तर माझ्या बॉयफ्रेंड सोबत असणारे सगळे संपर्क देखील तोडून टाकले. मात्र वडिलांना माहिती न होता मी माझ्या बॉयफ्रेंडशी बोलत असायची. तो देखील माझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करायचा. विशेष म्हणजे, त्याचे पालक आम्हा दोघांनाही खूप सपोर्ट करायचे. त्यांना माझे पालक मूर्ख असल्याचे वाटते. आम्ही दोघांनी कॉलेज पूर्ण होई पर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. कॉलेज पूर्ण झाल्यानंर आम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक त्याने मला तुझ्यासोबत राहायचं नाही, असा मेसेज केला, आणि मी पूर्णपणे तुटून गेले.
अचानक एक मेसेज करत तो मला म्हणाला, माझ्या आई वडिलांची इच्छा आहे, मी तुझ्यासोबत असणारे नाते तोडून टाकले पाहिजे. आणि म्हणून, यापुढे मी या नात्यामध्ये राहू इच्छित नाही. त्याच्या या मेसेजने मी पूर्णपणे तुटून गेले आहे. मला माझे रिलेशन टिकवायचे आहे. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. हे नाते टिकवण्यासाठी मी काय करू? अशी विनवणी पंधरा वर्षाच्या एका मुलीने केली आहे. (या घटनेच्या मूळ पात्राची ओळख गुपित ठेवली आहे)
मुलीला काय मिळाला सल्ला
मुंबईतील रिलेशनशिप कौन्सिलर रचना अवत्रामणी यांच्या म्हणण्यानुसार, कमी वयामध्ये एकमेकांवर प्रेम झाल्यानंतर, खूप वाईट वाटणं साहजिक आहे. हे खूप भवनिक नातं असेल, मात्र तुमच्या वडिलांनी तुम्हाला, बॉयफ्रेंडसोबत झोपले असताना पकडल्याने, आता तुमचा बॉयफ्रेंडही तुम्हाला साथ देत नसल्याचे दिसत आहे. हा तुझ्याकरिता अतिशय भावनिक, आव्हानात्मक काळ असणार आहे. मात्र तरीदेखील तू ही परिस्थिती अत्यंत सावधपणे हाताळणे आवशक्य आहे.
आम्ही तुझ्या भावनांचा आदर करतो, परंतु तुला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. कुटल्याही नातेसंबंधामध्ये राहण्याकरिता तुम्ही दोघेही खूपच लहान आहात. तुझं वय पंधरा वर्ष आहे. तुम्ही दोघेही अजून शाळेमध्ये शिकत आहात. अशा परिस्थितीत एकच सल्ला असेल, तुम्ही कॉलेजपर्यंत थांबा. तुम्ही अजूनही अल्पवयीन आहात. तुमचं वय रिलेशनशिपमध्ये राहण्यायोग्य नाही. तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. तुम्ही जसजसे मोठे व्हाल, तसं तुमचा लक्षात येईल, तुमच्या दोघांसाठी काय योग्य आहे, आणि काय अयोग्य ते.
कॉलेजला गेल्यानंतर तुम्ही, एकमेकांना भेटा. तोपर्यंत तुम्ही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्ही दोघांनीही महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसं-तसे अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि उर्वरित आयुष्य तुम्हाला सोपे जाईल.
सामग्री सौजन्य:TOI इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी यावर क्लिक करा
हे देखील वाचा Viral video: माकडाच्या पिल्लाची आणि पक्षांची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्..; व्हिडिओ एकदा पहाच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम