माणुसकीला काळीमा फासणारी घटना! तरुणांच्या टोळक्याने भररस्त्यात तरुणीसोब केले अश्लील घाणेरडं कृत्य; व्हिडिओ व्हायरल

0

समाजात आजही माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडताना आपण पाहतो. कधीकधी या घटना एवढ्या निंदनीय असतात, की, त्या वाचल्या ऐकल्या तरी माणूस म्हणून, आपलीच आपल्याला लाज वाटायला लागते. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना मध्यप्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यात घडली आहे. रस्त्याने जात असणाऱ्या दोन तरुणींना तरुणांच्या टोळक्याने मिठीत घेत घाणेरडं आणि निंदनीय कृत्य केल्याचा, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्यप्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यातला असून, काही दिवसांपूर्वी भगोरिया महोत्सवात हा घाणेरडा प्रकार घडला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तरुणांची मोठी टोळकी रस्त्याने जात असताना, समोरून दोन तरुणी चालत येत असल्याचं दिसत आहे. मात्र चालत येत असणाऱ्या या तरुणींना बळजबरीने पकडून ही टोळी घाणेरडे कृत्य करताना दिसत आहे. या दोन्ही तरुणी स्वतःला वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रेलरच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र रस्त्याने जात असणारी राक्षसं तरुणींना टोळीत ओढून नेत असल्याचं, व्हायरल झालेला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेला हा निंदनीय व्हीडिओ भगोरिया महोत्सवातला आहे. आदिवासीबहुल अलीराजपूरमधील ‘बालपूर’ या गावात या भगोरिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘बालपूर’ या गावात घडलेल्या या निंदनीय कृत्याचे पडसाद आता सोशल मीडियावर चांगलेच उमटत असून, या राक्षसांना फासावर लटकवण्याची गरज आहे, असा संताप आता व्यक्त करण्यात येतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ इतका निंदनीय आणि घाणेरडा वाटतोय की, पाहणाऱ्यांची तळपायाची आग मस्तकाला जातेय. तरुणांवर देशाचं भवितव्य असल्याचं आपण बोलतो, मात्र या राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमांनी हतबल झालेल्या दोन तरुणींचा विनयभंग करत, त्यांच्या सोबत घाणेरडं कृत्य करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन तरुणींचा रस्त्याने जात असतानाचा ज्या नराधमांनी विनयभंग आणि घाणेरडे कृत्य केलं, ते नराधम आणि त्या दोघीही धार जिल्ह्यातील एकाच गावाचे असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे रस्त्याने अनेक महिला आणि मुली जात असताना देखील या हतबल झालेल्या तरुणींना या नराधमांपासून कोणीही वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत नसल्याने समाजातली माणुसकी काही शिल्लक आहे का नाही, समाज इतका कसा असंवेदनशील होऊ शकतो? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.

या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांवर कारवाई देखील झाली आहे. काहींची ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत. लवकरच संबंधीत आरोपींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती, अलीराजपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज सिंह यांनी दिली आहे.

हे देखील वाचा 

उत्तर प्रदेश निवडणुक ‘या’ जातीय समीकरणावर झाली; वाचा कुठल्या पक्षाला कोणी आणि किती टक्के मतदान केले..

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने सोशल मीडियावर भामट्याचा धुमाकूळ; अनेकांना दमदाटी आर्थिक फसवणूक, वाचा फिल्मी स्टाईल कहानी…

Samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या ‘या’ फोनने बाजारात केलाय कहर..

Maharashtra Budget 2022:* *अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.