आठवतायत का मनसेचे ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील 13 आमदार, जाणून घ्या सविस्तर..

0

2009 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार झालेले मनसेचे आमदार:

१) रामचंद्र शिवाजी कदम – राम कदम:                    2009 मध्ये राम कदम (Ram Kadam) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले. त्यावेळी शपथ विधीमध्ये मराठीत शपथ घेतली नाही म्हणून अबू आझमीच्या कानशिलात लगवण्यात राम कदम यांचा पुढाकार होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम कदम यांनी मनसेला रामराम करत अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ते राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या जाण्याने मनसेची बरीच हानी झाली.

 

2) शिशिर कृष्णराव शिंदे: शिशिर शिंदे (Shishir Shinde) राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडले. ते मनसेच्या तिकिटावर २००९ मध्ये आमदार झाले. अगोदर शिवसेनेत त्यांनी 24 वर्ष विविध पदांवर काम केले आहे. 1992 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान बाळासाहेबांच्या आदेशानुसार त्यांनी वानखेडे स्टेडियमवरील धावपट्टी काढून टाकली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी मैदानावर ऑईल सुध्दा टाकले होते. त्यामुळे सामनाच रद्द झाला होता.

 

मनसे पक्षाने त्यांना २०१४ मध्ये संधी दिली मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाने डावलले अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत पुन्हा घरवापसी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखले जात होते. आक्रमक आणि आंदोलने यासाठी शिशिर शिंदे प्रसिध्द होते. 1990 मध्ये जेव्हा सणासुदीच्या काळात तेलाचा तुटवडा झाला होता तेव्हा त्यांनी धारा तेलाचे ट्रक अडवून तेल वाटप केले होते.

 

3) वसंतराव निवृत्ती गीते: वसंतराव निवृती गीते (vasant Gite) 2009 मध्ये मनसेकडून नाशिक मध्यचे आमदार झाले. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी मनसेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. मनसे पक्ष का सोडला? यावर बोलताना वसंत गीते म्हणतात आम्ही पक्ष स्थापन होण्याच्या आधीपासून कामं केली होती. आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केले. लोकांच्या अपेक्षा फार होत्या. परंतु ACमध्ये बसून राजकारण करणाऱ्या ठराविक लोकांचे राज साहेबांनी ऐकलं.

 

राज साहेबांनी जर तरुणांना वेळ दिला असता तर मनसेला सोडून कोणच गेलं नसतं,” असे ते म्हणाले.भाजपमध्ये त्यांना प्रदेश सरचिटणीस पदावर संधी मिळाली होती मात्र परत त्यांना कार्यकारणी सदस्यपद दिल्याने त्यांनी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला व शिवसेनेत प्रवेश केला. मनसेमध्ये देखील घरवापसी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

 

4) बाळा नांदगावकर: बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे राज ठाकरे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत समजले जातात. राज ठाकरे यांची सावली म्हणून ते नेहमी राज यांच्या सोबत प्रत्येक प्रसंगात उभे असतात. बाळा नांदगावकर यांना मनसेतून 2009 विधानसभा तिकीट देण्यात आले होते. शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदारही झाले.

 

परंतु 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बाळा नांदगावकर यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवण्यास बाळा नांदगावकर इच्छुक नव्हते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली आणि तेथेही त्यांना अपयश आले. जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्या पहिल्या दिवसापासून बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्यासोबत होते. ते त्यावेळी शिवसेनेचे आमदार होते.

 

5) रमेश हिरामण वांजळे: रमेश वांजळे (Ramesh Wanjale) यांना ओळखत नसतील असे फार कमी लोक असतील. राज साहेबांचा पुण्यातील ढाण्या वाघ आणि गोल्डन मॅन अशी रमेश वांजळे यांची ओळख होती. स्मशाभूमीचा सुरक्षारक्षक ते आमदार असा रमेश वांजळे यांचा राजकीय प्रवास आहे. वांजळे हे अहिरे या गावचे सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली.

 

त्यानंतर वांजळे पंचायत समिती उपसभापती झाले. त्यानंतर जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने त्यांनी आपली पत्नी हर्षदा वांजळे यांना निवडून आणले. त्यामुळे वांजळे यांचा आत्मविश्वास वाढला होता. ते काँग्रेसमध्ये होते. मात्र त्यांना विधानसभा लढवायची होती. त्यावेळी त्यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. त्यामुळे त्यांना पक्ष बदलावा लागला.

 

राज ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना 2009 च्या विधानसभेचे तिकीट दिले. ते आमदार झाले. त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पराभव केला होता. वांजळे त्यांच्या अंगावर असलेल्या सोन्यामुळे खूप प्रसिद्ध झाले होते. 2011 मध्ये रमेश वांजळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अन्यथा कदाचित ते आजही राज ठाकरे यांच्या सोबत पाहायला मिळाले असते.

 

6) मंगेश सांगळे: 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मंगेश सांगळे (Mangesh sangale) मनसेच्या तिकिटावर आमदार झाले. राज ठाकरे यांनी मंगेश सांगळे यांना सरचिटणीस पद दिले होते. 2017 मध्ये मंगेश सांगळे यांनी मनसेला राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. राज ठाकरे यांच्यामुळे आपल्याला चेहरा मिळाला, काही घटना घडल्या त्यामुळे मी पक्ष सोडला त्यावर बोलणे उचित नाही. असे ते म्हणाले होते

 

7) नितीन केशवराव भोसले: नाशिकचे नितीन भोसले (Nitin Bhosale) हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर आमदार झाले. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ते अजूनही आंदोलन, मोर्चे काढून मनसे पक्षासाठी मनसे काम करत आहेत. त्यांची राज ठाकरे आणि मनसेवर निष्ठा आहे.

 

8) रमेश रतन पाटील: रमेश रतन पाटील (Ramesh Ratan Patil) हे 2009 मध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून विधानसभेवर मनसेकडून निवडून गेले. त्यांनी काँग्रेसमधून मनसेत प्रवेश केला होता. पुन्हा त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. काही काळ भाजपात रमल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. मनसेचे एकमेव आमदार राजू रतन पाटील यांचे ते मोठे बंधू आहेत.

 

9)प्रवीण यशंवराव दरेकर: सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. अगोदर शिवसेना नंतर मनसे त्यानंतर भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांची राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख होती. राज यांचा निकटवर्तीय असल्याचा फटका त्यांना बसल्याचे बोलले जाते. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत दरेकरांचा पराभव झाला आणि पुढे त्यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला.

 

10) हर्षवर्धन रायभान जाधव: हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम करत 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा आमदारकी मिळवली. तिथेही त्यांचे सूत जुळले नाही. 2019 ची विधानसभा त्यांनी अपक्ष लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांनी पुन्हा एकदा 2020 मध्ये मनसेत प्रवेश केला.

 

11) प्रकाश सुखदेव भोईर: प्रकाश भोईर (Prakash Bhoir) हे 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदासंघातून आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवणुकीत पुन्हा त्यांना मनसेने तिकीट दिले परंतु त्यांचा पराभव झाला. राज ठाकरे यांचे निष्ठावंत असलेल्या प्रकाश भोईर यांना मनसेने पुन्हा एकदा आमदारकी लढवण्यास संधी दिली. मात्र 2019 मध्ये दुसऱ्यांदा त्यांना पराभव पत्करावा लागला. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत राज ठाकरे यांच्यासोबत राहणार असे ते म्हणाले.

 

12) नितीन विजयकुमार सरदेसाई: नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) हे 2009 मध्ये माहिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते राज ठाकरे यांचे व्यवसायिक भागीदार देखील आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आहे.

 

13) ॲड. उत्तमराव नथुजी ढिकले: सहकामहर्षी ॲड. उत्तमराव नथुजी ढिकले (Nathuji Dhikale) हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर आमदार झाले. 2014 ची निवडणूक त्यांनी लढवली नाही. एप्रिल 2015 मध्ये त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शिवसेनेकडून ते खासदार देखील होते. ते नाशिकचे महापौरसुध्दा झाले होते.

हेही वाचा: Mahatma Gandhi: इंग्रजांसोबत करार करूनही गांधींजी भगतसिंग यांची फाशी का रोखू शकले नाहीत,वाचा सविस्तर 

२४ पोते कांद्यांची पट्टी केवळ १३ रुपये; या १३ रुपयांत काय शेतकऱ्याने सरकारचा तेरावा घालायचा का.. 

स्वतः विधानपरिषद सभापती, एक भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष, एक भाऊ बाजार समिती सभापती तर आता पुतण्याला केले पंचायत समिती सभापती 

रोहित पवार यांची राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी लागणार वर्णी, एवढंच नव्हे तर रोहित पवार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.