दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून

महाराष्ट्रासह देशात गुन्हेगारीचे प्रमाण एवढे वाढत चालले आहे की कधीही काहीही घडायला लागले आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक एकमेकांचे जीव घेत आहेत. अशीच एक घटना घडली आहे पुण्यातील हडपसर या ठिकाणी. आपल्या पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून नवऱ्याने  बायकोच्या डोक्यात तवा मारून खून केल्याची  घटना घडली आहे. या घटनेमुळे  एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून झालेल्या महिलेचे नाव  कला आदिनारायण यादव (३०) असे  आहे. आरोपी  आदिनारायण कंटू यादव यास हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आदिनारायण कंटू यादव आणि पत्नी कला आदिनारायण यादव हे दोघे केशवनगर येथे मागील अनेक वर्षापासुन राहत होते.

आदिनारायण व कला या पती पत्नीचे फारसे जुळत नव्हते. त्या दोघात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत असायचे. परंतु गुरूवारी दुपारच्या सुमारास आदिनारायण याने पत्नी कलाकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. तेव्हा कलाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने रागाच्या भरात चुलीवर  असलेला तवा आपल्या पत्नीच्या म्हणजे कलाच्या डोक्यावर जोरात आपटला.

यामध्ये पत्नी(कला) रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर पत्नी(कला) हिला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र तिचा मृत्य झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेनंतर आरोपी पती आदिनारायण  कंटू यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दखल झाला आहे आरोपीला शिक्षा मिळेल. दारूच्या नशेसाठी एक बळी गेला ही गोष्ट नक्कीच आपल्या सर्वांना विचार करायला लावण्यासारखी आहे. खरंच जीवन एवढं सोपे झाले आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.