Hardik Pandya Jay Shah: हार्दिक पांड्याच्या या खेळीने रोहित शर्माच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या हार्दिकची रणनीती..

0

Hardik Pandya Jay Shah: गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या तिघांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. रोहित शर्माला विश्वासात न घेता मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानंतर, तिघांमधील वाद चव्हाट्यावर आला. रोहित शर्माची पत्नी रीतिकाने (ritika) उघडपणे आपली नाराजी बोलून देखील दाखवली. हार्दिक पांड्या देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित शर्माला डिवचताना पाहायला मिळाला. आता मात्र हार्दिक पांड्याने रोहित शर्माला चांगलेच अडचणीत आणले आहे.

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक नंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ उभारायला सुरुवात झाला. विराट कोहली (Virat kohli) रोहित शर्मा, केएल राहुल (kl Rahul) या तिघांना टी-ट्वेंटी मधून वगळण्यात आलं. अनेक नवीन खेळाडूंना संधी देत नवा संघ बांधायला सुरुवात देखील झाली. परंतु आता अचानक रोहित शर्मा आणि विराट कोहलीची संघात वापसी झाली. इतकंच नाही, तर या वर्षी होणाऱ्या t20 विश्वचषकात रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व देखील देण्यात आल्याचं बोललं जाऊ लागलं.

नुकत्याच पार पडलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत देखील रोहित शर्मा करणार कर्णधार होता. विराट कोहलीचे देखील टी-20 मध्ये कमबॅक झालं आहे. साहजिकच या सगळ्या शक्यतांमुळे टी ट्वेंटी विश्वचषकात देखील विराट तिसऱ्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता हार्दिक पांड्याने नवी खेळी खेळल्याने रोहित शर्मा अडचणीत आला आहे.

हार्दिक पांड्याचे भारतीय टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न लपून राहिले नाही. 2022 नंतर झालेल्या अनेक t20 सिरीज मध्ये हार्दिक पांड्याने कर्णधार पदाची भूमिका बजावली. इतकेच नाही, तर अनेक पत्रकार परिषदांमध्ये हार्दिक पांड्याने हा माझा संघ आहे. मी माझ्या संघाला माझ्या दृष्टीने तयार करणार असल्याचे बोलूनही दाखवले होते. मात्र रोहित शर्माची पुन्हा t20 संघात वापसी झाल्याने हार्दिक पांड्याच टी ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाचे स्वप्न भंगले होते.

आगामी विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर, हार्दिक पांड्याने नवी खेळी खेळली आहे. 12 तारखेला गांधीनगर लोकसभा प्रीमियर लीग या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा आणि हार्दिक पांड्या (amit shah and hardik Pandya) यांच्या हस्ते करण्यात आले. दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाल्यानंतर, याचा थेट संबंध t20 विश्वचषकाशी जोडला जात आहे.

हार्दिक पांड्याचे अमित शहा आणि जय शहा (jay shah) यांच्यासोबत खूप जवळचे संबंध आहेत. यापूर्वी देखील हार्दिक पांड्या अमित शाह यांना भेटला होता. हार्दिक पांड्याची, BCCI चेरमन जय शहा, अमित शहा यांच्याबरोबर जवळीकता वाढत चालली आहे. हार्दिक पांड्या या दोघांसोबत केवळ भारतीय टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व मिळवण्यासाठीच जवळीकता वाढवत असल्याचे बोललं जात आहे. जय शहाने जर मनात आणलं, तर रोहित शर्माचा काहीही इलाज चालणार नाही. हार्दिक पांड्याच्या या नव्या खेळीमुळे आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये कोण कर्णधार असणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा IND vs ENG Rajkot test: सरफराज खान खेळणार का? जाणून घ्या राजकोट कसोटीसाठीची भारतीय प्लेइंग11..

Rahul Dravid vs Ishan Kishan: ..म्हणून आयपीएल चांगले गेले तरी संधी नाही! द्रविड, रोहीत नंतर BCCI चाही किशनला इशारा; जाणून घ्या नाराजीचे कारण..

IND vs ENG test series: विराट कोहली दारू पिऊन माझ्या अंगावर थुंकला; या दिग्गज फलंदाजाच्या आरोपाने खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.