Virat Kohli miss out: विराट कोहलीचे कमबॅक लांबणीवर; जाणून घ्या विराट कधी परतणार मैदानावर..
Virat Kohli miss out: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test series) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील दोन सामने पार पडले असून, दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. भारतीय दौऱ्यावर इंग्लंडने दमदार खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे उर्वरित तीनही कसोटी सामने रंगतदार होणार असल्याचं बोलले जात आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. वैयक्तिक कारण देत माघार घेतल्याने, चाहत्यांची देखील मोठी निराशा झाली. विराट सध्या दमदार फॉर्ममध्ये असल्याने, त्याच्या बॅटमधून क्रिकेट चाहते शतकांची अपेक्षा लावून बसले आहेत. विराट कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यात परतणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता विराट कोहली तिसरा कसोटी सामना देखील खेळणार नसल्याचे cricbuzz ने स्पष्ट केले आहे.
इंग्लंड विरुद्ध खेळायला गेलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजी साधारण राहिली होती. विराट कोहलीची कमतरता दोन्ही सामन्यात जाणवली होती. आता मात्र तिसरा आणि चौथा कसोटी सामना विराट कोहली खेळणार नसल्याचे ESPNcricinfo च्या रिपोर्टमध्ये म्हंटले आहे. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात देखील विराट कोहली खेळणार की नाही,याविषयी स्पष्टता करण्यात आली नाही. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर झाला हे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे.
विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार असल्याने, सध्या तो आपल्या बाळाची प्रतीक्षा करत आहे. विराट कोहलीचा मित्र एबी डिव्हिलियर्सने काही दिवसापूर्वी या संदर्भात खुलासा केला होता. विराटने आपल्या फॅमिली सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं देखील एबी डिव्हिलियर्स आपल्या युट्युब चॅनेलच्या लाईव्ह सेशन दरम्यान म्हणाला होता.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याने, भारतीय संघाच्या फलंदाजीवर देखील प्रेशर राहणार आहे. विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे आता सरफराज खानला (sarfaraaz khan) भारताच्या प्लेइंग11 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. दुसऱ्या कसोटीचा पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरल्याने, आता त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.
हे देखील वाचा Onion export ban : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? जाणून घ्या केंद्र सरकारचा प्लॅन..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम