ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

0

ritika sajdeh on Mumbai Indians: आयपीएलला (ipl ) भारतामध्ये उत्सवाप्रमाणे महत्त्व प्राप्त झालं आहे. आयपीएलचा खूप मोठा चाहता वर्ग केवळ भारतातच नाही, विदेशादेखील पाहायला मिळतो. आयपीएल 2024 (IPL 2024) ची ऑक्शन प्रक्रिया पार पडली असून, लवकरच क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळणार आहे. आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जातं. मुंबई इंडियन्सचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. मात्र यावेळी मुंबई इंडियन्स चाहत्यांना (Mumbai Indians) रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून पाहायला मिळणार नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी (IPL trophy) जिंकली आहे. त्यामुळे मुंबई इंडियनचा चाहता वर्ग रोहित शर्माचाही चाहता आहे. मुंबई इंडियन्सच्या चात्यांना रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय पटला नाही. रोहित शर्माचे अचानक कर्णधार पदावरून हकलपट्टी करून हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्स(mumbai Indians) संघाचे कर्णधारपद देण्यात आले. हा निर्णय का घेतला गेला, याविषयी मुंबई इंडियन्सचे कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी आता स्पष्टीकरण दिल्याने, पुन्हा खळबळ माजली आहे.

अचानक रोहित शर्माला मुंबई इंडियन संघाच्या कर्णधार पदावरून काढण्याचा निर्णय केवळ चाहत्यांनाच नाही, तर रोहित शर्माला देखील पटला नसल्याचं समोर आलं. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने (ritika sajdeh) या विषयी उघडपणे आपली नाराजी देखील बोलून दाखवली. कर्णधार निवडीवर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) एकाही मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूने शुभेच्छा दिल्या नाहीत. आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्स, आणि रोहित शर्मा हा वाद उभाळून आला आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे कोच मार्क बाउजर यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माला कर्णधार पदावरून का काढून टाकले? याविषयी भाष्य केले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. रोहीत शर्माची पत्नी रितिका सजदेह हीने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली असून, मुंबई इंडियन्सच्या गोटात भूकंप आला आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे कोच मार्क बाऊचर रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकण्याचं कारण स्पष्ट करताना म्हणाले, हा बदल करण्याचा कालावधी आहे. हार्दिक पांड्याला संघात घेण्याची संधी होती. ठराविक काळानंतर संघात अनेक बदल करावे लागतात. कॅप्टन पदावरून बाजूला केल्यानंतर, रोहित शर्मा फलंदाज म्हणून मुक्तपणे फलंदाजी करेल. असा आम्हाला वाटलं.

भारतीय चाहते खूप भावनिक आहेत. मात्र प्रॅक्टिकली होऊन तुम्हाला विचार करावा लागतो. मार्क बाऊचरने केलेल्या या विधानावर रोहित शर्माच्या पत्नी रितिकाने मुंबई इंडियन्सला जोरदार फटकारले आहे. कमेंट करून रितिका म्हणाली, यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. रोहित शर्माला चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आलं असे रीतिकाने म्हटल्याने, मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

हे देखील वाचा  England team leaves India : दुसऱ्या कसोटीनंतर या कारणामुळे इंग्लंडने सोडला भारत; कारण जाणून तुम्हीही..

india squad for 3rd test : तिसऱ्या कसोटीत होणार हे आश्चर्यकारक बदल; या खेळाडूच्या जागी सरफराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी..

Acharya Chanakya on wife: बायकोपासून या चार गोष्टी लपवल्या तरच मिळेल सन्मान आणि नातं टिकेल दीर्घकाळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.