मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीराजे यांचे सूचक विधान.

0

गेले कित्येक दिवस गेले कित्येक दिवस महाराष्ट्र भर गाजत असलेला आरक्षण आरक्षण हा प्रश्न . न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आरक्षणाचा मुद्दा हा राज्य सरकारचा असून गरज पडली तर केंद्राची मदत  घेऊन देखील राज्यघटनेमध्ये बदल करता येईल का? यावरती माझा अभ्यास चालू आहे, असे विधान खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

पावसामुळे पंढरपूरचे नुकसान झालेले असल्यामुळे पंढरपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून लवकर मदत मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन व राज्य शासनाने देखील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यायला हवी असे देखील ते म्हणाले.

आपण ECBC कायदा केलेला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज असल्याचे कबूल केले आहे.
तशी मान्यता मागासवर्ग आयोगाने दिली आहे. हायकोर्टाने देखील  या कायद्याला मान्यता देऊन मराठा समाजाच्या बाजूने व आरक्षणाच्या दृष्टीने या कायद्याला मान्यता दिली आहे. यामध्ये राज्य शासनाने जातीने लक्ष घालून आरक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत असे देखील खासदार संभाजीराजे म्हणाले.
शरद पवार यांनी केलेल्या “दोन्ही छत्रपतींनी मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्राकडून सोडवून घ्यावा” या विधानाबद्दल विचारले असता छत्रपती संभाजीराजे यांनी बोलण्यास नकार दिला.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे यांचे प्रयत्न सतत चालू असतात. गेल्या बरेच दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय झाले आहेत. मग केंद्र सरकार असो राज्य सरकार या दोन्ही ठिकाणी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. एमपीएससीच्या परीक्षे वरती स्थगिती द्या अन्यथा परीक्षा केंद्रे फोडू असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता. त्यांच्या या मागणीची राज्य शासनाने दखल घेऊन परीक्षा स्थगित केल्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.