Ishan Kishan BCCI: होय BCCI ला गंडवल्यामुळे इशान किशनला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या ते प्रकरण..
Ishan Kishan BCCI: चार दिवसापूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टी ट्वेंटी मालिकेसाठी निवडलेल्या संघाची जोरदार चर्चाही झाली. रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार आणि विराट कोहलीला (Virat kohli) संघात संधी दिल्याने, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विराट आणि रोहितच्या निवडीपेक्षाही मोठा धक्का ईशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवल्याने झाला. ईशान किशनला (ishan Kishan) वगळण्याचे धक्कादायक कारणही आता समोर आले आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सिरीजसाठी निवडलेल्या संघाला विशेष महत्व आहे. याचवर्षी वेस्टइंडीजमध्ये भारतीय संघाला टी ट्वेंटी विश्वचषक खेळायचा आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी भारतीय संघाकडे तयारीसाठी केवळ अफगाणिस्तान विरुद्ध होणारे तीन टी-ट्वेन्टी सामनेच असणार आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध निवडलेल्या संघातील खेळाडूंपैकीच आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला जाईल.
ईशान किशन ऐवजी संजू सॅमसनची दुसरा विकेटकीपर फलंदाज म्हणून निवड केली आहे. संजू सॅमसनने दमदार खेळाचे प्रदर्शन केले, तर ईशान किशनला भारताच्या t20 संघात वापसी करणे अवघड होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये ईशानने चांगली कामगिरी केली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून त्याने अचानक मानसिक आरोग्याचे कारण देत माघार घेतली होती.
ईशान किशनने मला मानसिक थकवा आला आहे. माझे मानसिक आरोग्य बरोबर नाही. मला ब्रेक हवा आहे. असं निवड समितीला पत्राद्वारे कळविले होते. निवड समितीने देखील इशानची ही मागणी मान्य करून त्याला विश्रांती दिली. ईशान किशनने विश्रांती घेतली कारण, दक्षिण आफ्रिकेत आव्हानात्मक खेळपट्टी आहे. या खेळपट्ट्यावर आपण एक्सपोज होईल, या भीतीने त्यांने माघार घेतल्याचं बोललं गेलं.
एकीकडे ईशान किशनने मानसिक आरोग्याचे कारण पुढे करत माघार घेतली. तर दुसरीकडे तो दक्षिण आफ्रिका सिरीज सुरू असतानाच दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. या संदर्भातले व्हिडिओही समोर आले. ईशान किशनने BCCI ला मानसिक आरोग्याचे कारण देत सुट्टी घेतली. आणि दुबईमध्ये पार्टी केली. साहजिकच ईशान किशनने खोटं बोलत एकप्रकारे गंडवले. ईशान किशनचे हे कृत्य बीसीसीआयने चांगलेच मनावर घेतले आहे.
ईशान किशनने बीसीसीआयशी खोटे बोलून सुट्टी घेतल्यामुळे, त्याला अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी-ट्वेंटी सिरीज मधून वगळण्यात आल्याची माहिती आहे. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाडसह अनेक महत्त्वाचे खेळाडू या टी ट्वेंटी सिरीजचा भाग नाहीत. तरीही ईशान किशनला वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र बीसीसीआयशी बागवत करणे ईशान किशनला चांगलंच भोवले आहे.
हे देखील वाचा GMC Nagpur Recruitment 2024: 10वी पाससाठी या विभागामध्ये 680 जागांची सरकारी नोकर भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम