RAILTEL Recruitment: पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी; लगेच करा असा अर्ज..

0

RAILTEL Recruitment: अलीकडच्या काळात नोकरी शोधणं आणि मिळवणं फार कठीण बनलं आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती निघाली आहे. रेल्वे कडून यासंदर्भातली अधीसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 21 ऑक्टोंबर पासून 11 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

कोणकोणत्या पदासाठी किती जागा?

“सहाय्यक व्यवस्थापन” या पदासाठी 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “उपव्यवस्थापक पदासाठी” 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “मार्केटिंग” या पदासाठी पंधरा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “फायनान्स आणि एचआर” या पदासाठी अनुक्रमे सहा आणि सात रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि फी

मार्केटिंग, एचआर, फायनान्स, या पदासाठी उमेदवाराने मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रामधील डिप्लोमा देखील उमेदवाराचा पूर्ण असणे आवश्यक आहे. खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना बाराशे रुपये अर्ज शुल्क असेल. तर इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये शुल्क आकारले जाईल.

निवड प्रक्रिया आणि पगार

उमेदवारांच्या निवडी प्रक्रिये विषय बोलायचे झाल्यास, उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणीच्या माध्यमातून होणार आहे. चाचणी बरोबरच उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीनंतर, गुणांची अंतिम यादी प्रसारित केली जाईल. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना चाळीस हजारापासून एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत दरमहा पगार मिळणार आहे.

असा करा अर्ज

पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.railtelindia.com/ असं सर्च करावे लागेल. त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरून सविस्तर अर्ज करू शकता.

हे देखील वाचा ENG vs SL: इंग्लंड अधिकृतरित्या बाहेर! श्रीलंकेच्या विजयाबरोबरच स्पष्ट झाले चार सेमी फायनलिस्ट..

IND vs ENG WC Match : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया संकटात; दुखापतीमुळे स्टार खेळाडू दोन सामन्यातून बाहेर..

Indian cricket team head coach: मोठी बातमी! मुंबईकर Amol Muzumdar भारतीय क्रिकेट टीमच्या कोच पदी विराजमान..

UT69 : राज कुंद्रा शिल्पा शेट्टी खरंच वेगळे झालेत? झाला मोठा खुलासा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.