Shoaib Akhtar on Virat Kohli : कोहलीचा तिरस्कार करत शोएब अख्तर पुन्हा बरळला; म्हणाला..

0

Shoaib Akhtar on Virat Kohli: भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. 2003 पासून भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी स्पर्धेत जिंकता आलं नव्हतं. आयसीसी स्पर्धेत (ICC trophy) भारतीय संघावर नेहमीच वरचड राहिलेल्या न्यूझीलंड संघ या विश्वचषकात देखील भारतीय संघावर वरचड असल्याचं बोललं जात होतं होतं.

मात्र सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर, विराट कोहलीने (virat kohli) दमदार खेळ करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. परंतु विराट कोहलीचा हा खेळ शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) पचनी पडला नसून, त्याने विराट कोहलीवर जोरदार टीका केली आहे. एक प्रकारे त्याने विराट कोहलीवर टीका करताना आपल्या अकलेचे तारे तोडत एक अजब तर्क लावला आहे.

विराट कोहलीने आपला फॉर्म गमावल्यानंतर, अनेक क्रिकेट दिग्गजांनी विराटला अनेक सल्ले दिले. अनेकांनी विराटच्या फलंदाजीत अनेक त्रुटी असल्याचं बोलत, बॅट आणि पॅडमध्ये प्रचंड गॅप राहत असल्याने विराट बाद होत असल्याचही सांगितलं. अगदी भारतीय माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी देखील विराटने जर आपला सल्ला घेतला, तरी मी त्याला फलंदाजीच्या टिप्स देईन असेही भाष्य केले.

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने तर थेट विराट कोहली आता संपला आहे. असं मला लोक बोलतात. अशाप्रकारे आपली अक्कल पाजळली होती. शोएब अख्तरने आता पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चैनलवर बोलताना आपल्या अकलेचे तारे तोडत न्युझीलँड विरुद्धच्या सामन्यानंतर, विराट कोहलीला टार्गेट केलं आहे.

आपल्या यूट्यूब चैनलवर बोलताना शोएब अख्तर म्हणाला, विराट कोहली चांगला खेळला. मात्र जर केल राहुल (kl Rahul) चौथ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आला असता, तर त्याने 42 षटकाच्या आतमध्येच हा सामना संपवून टाकला असता. एवढेच नाही, तर श्रेयस अय्यर जास्त वेळ राहिला असता, तर त्यानेही हा सामना लवकर संपवला असता.

विराट कोहली चांगला खेळला. सामना संपवून बाहेर येणे त्याची सवय आहे. असं केल्याने त्याचे इंस्टाग्रामवर फॉलोवर्स वाढतात. मात्र यामध्ये काही चुकही नाही. असंही तो बरळला आहे. अख्तरच्या या विधानामुळे आता त्याला सोशल मीडियावर टोल केलं जात आहे. अनेकांनी युट्युबवर व्ह्यूज मिळवण्यासाठी असा तो नेहमी बरळत असतो. असंही म्हटलं आहे.

हे देखील वाचा IND vs NZ: ..म्हणून विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला केले जाणून बुजून रन आउट; गंभीर आरोपामुळे खळबळ..

IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..

Chanakya Niti for women: या तीन गोष्टीत महिला नेहमी पुरुषावर गाजवतात हुकूमत; पुरुष या बाबतीत महिलांच्या आसपासही नाहीत..

PAK vs AFG: पाकिस्तानच्या पराभवामुळे सेमी फायनलचे गणित झाले स्पष्ट; भारत, न्युझीलंड आफ्रिका नंतर हा संघ पोहचणार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.