IND vs AUS 1St ODI: रोहित, विराट, हार्दिकला विश्रांती; या चार नव्या खेळाडूंची संघात एन्ट्री: जाणून घ्या पहिल्या वनडे साठी भारतीय टीम..

0

IND vs AUS 1St ODI: ऑक्टोंबरमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाबरोबर तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाने आपला संघ घोषित केला आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघात अनेक मोठे बदल करण्यात आले असून, या संघ निवडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

विश्वचषकाची तयारी करण्यासाठी भारतीय संघाकडे केवळ तीन एकदिवसीय सामने होते. भारतीय क्रिकेट संघाच्या अनेक खेळाडूंनी गेल्या काही महिन्यात फारसे क्रिकेट खेळले नाही. तरी देखील अनेक खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विश्रांती दिल्याने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

22 सप्टेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. काल पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये रोहित शर्मा (rohit sharma) विराट कोहली (Virat kohli) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी केएल राहुलला (kl Rahul captain) कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेत अक्षर पटेलला दुखापत झाल्याने भारतीय संघात रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली असल्याचं निवड समिती आणि कॅप्टन रोहित शर्मा कडून सांगण्यात आलं आहे. रविचंद्रन अश्विन भारताच्या विश्वचषक संघात देखील असण्याची दाट शक्यता आहे. आश्विन बरोबर ऋतुराज गायकवाड याचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केलेल्या, तिलक वर्माची देखील ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्माने, सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्याचा घेतलेला निर्णय भारतीय संघाच्या अंगलट येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

असा आहे पहिल्या दोन सामन्यासाठीचा भारतीय संघ..

केएल राहुल (कॅप्टन) (शुभमन गिल) ऋतुराज गायकवाड़,, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव तिलक वर्मारवींद्र जडेजा (उपकॅप्टन) रविचंद्रन अश्विन शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

हे देखील वाचा Babar Azam: Asia Cup मधून बाहेर होताच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; ..म्हणून बाबर शाहीन आफ्रिदी एकमेकांना भिडले; पाहा व्हिडिओ..

Shubman Gill Relationship: दोघांचं ब्रेकअप झालं, आता तिने गिलला इंस्टाग्रामवर फॉलोही केलं आणि..; पाहा दोघांच्या नात्याचं स्टेट्स..

IND vs SL Asia Cup final: एवढा माज बरा नाही..! गिलने ती मागणी करताच रोहित म्हणाला, अजिबात नाही, मूर्ख आहेस का; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.