IND vs WI 2nd ODI: या खेळाडूचा पत्ता कट करून अखेर संजूची प्लेइंग इलेव्हन मध्ये एन्ट्री; पाहा दुसऱ्या सामन्याचा संघ..
IND vs WI 2nd ODI: भारत आणि वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना देखील संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. पहिल्या सामनात वेस्टीज संघाने केवळ 115 धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले. मात्र या धावा करताना देखील भारतीय फलंदाजाचा घाम निघाला. आज दुसरा एकदिवसीय सामना होणार असून, संघ निवडी बरोबरच पहिल्या सामन्यानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
वेस्टइंडीज विरुद्धचा दौरा भारतीय संघासाठी आव्हानात्मक नसला तरी आगामी विश्वचषकाची तयारी म्हणून, या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. मात्र भारतीय संघ विश्वचषकाची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहत नसल्याचं पहिल्या तरी सामन्यात दिसून आलं. त्याचे कारण म्हणजे, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची मोठी संधी कर्णधार रोहित शर्माने गमावली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकतात का? हे पाहण्याची संधी कर्णधाराने गमावली. पहिल्याच सामन्यामध्ये रोहित शर्मा बचावात्मक पवित्र्यात मैदानात उतरल्याचे दिसून आलं. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला (sanju Samson) संधी मिळायला हवी असं अनेकांना वाटत होतं. मात्र त्याच्या ऐवजी ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली.
संजू सॅमसनला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नसल्याने अनेकांनी टीका केली. मात्र आजच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवच्या (suryakumar yadav) जागी संजू सॅमसनला संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या सूर्यकुमार यादवला आता टीम मॅनेजमेंट बाहेरचा रस्ता दाखवणार असून, त्याच्या जागी संजूला संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सूर्यकुमार यादवने एकूण 24 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये केवळ 23.8 च्या सरासरीने 452 धावा केल्या आहेत. दुसरीकडे संजू सॅमसनने 8 वर्षांपूवी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली. आठ वर्षामध्ये त्याला केवळ 28 सामने खेळायला मिळाले. संजूने 11 एकदिवसीय सामन्यात तब्बल 66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
असा असेल भारतीय संघ
रोहित शर्मा (कॅप्टन) शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक/ सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार.
हे देखील वाचा Bhuvneshwar Kumar: या कारणामुळे भुवनेश्वर कुमारला नाईलाजाने घ्यावा लागला निवृत्तीचा निर्णय..
WI vs IND 1St ODI: ..म्हणून संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला दिली संधी; हे धक्कादायक कारण आले समोर..
SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम