Mumbai News: लग्नाला न बोलवता जेवायला जाताय का? ही बातमी तुमच्यासाठी आहे; कारण तरुणांची झाली ‘अशी’ अवस्था..
Mumbai News: बरेचदा लग्न किंवा कार्यक्रमांमध्ये काही लोक फक्त जेवण करण्यासाठी, त्या ठिकाणी येत असतात. शक्यतो न बोलवता येणाऱ्या पाहुण्यांमध्ये आजूबाजूचे लोक असतात. लग्नामध्ये किंवा काही कार्यक्रमांमध्ये जाऊन जेवण करणे हा काही गुन्हा नाही. परंतु काही कार्यक्रमांमध्ये ठराविकच लोकांसाठी जेवण बनवलेले असते. त्यामुळे मग न बोलवता आलेले आजूबाजूचे लोक या कार्यक्रमांमध्ये घुसल्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांचे नियोजन बिघडते. त्यामुळे मग ज्या पाहुण्यांसाठी जेवण बनवलेले असते त्यांना देखील कधी कधी उपाशी रहावे लागते. (Mumbai News)
बिन बुलाये मेहमान म्हणून एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलेल्या एका तरुणाची अवस्था खूपच भयानक झाली. मुंबईमधील (Mumbai) गोरेगावचा राहणारा जावेद कुरेशी (वय २४) आपल्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला होता. त्यावेळी त्यांना जोगेश्वरीमध्ये रस्त्याने एक हॉल पाहायला मिळाला. या ठिकाणी एक कार्यक्रम देखील असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जावेद सोबत असणाऱ्या त्याच्य 17 वर्षीय चुलत भावाने आपण या ठिकाणी जेवण करायला जाऊया असे म्हणत, घेऊन गेला. त्या ठिकाणी प्रवेश करून जावेद आणि त्याचे मित्र जेवण करण्यासाठी बसले. त्यांना जेवण देखील मिळाले.
जावेद आणि त्याचे मित्र जेवण करत असताना काही लोक त्यांच्याजवळ आले. कारण हे लोक नवरीकडीलही नव्हते आणि नवरदेवाकडील नव्हते, हीच बाब तेथील पाहुण्यांच्या लक्षात आली. कारण त्यांना या तरुणांवर संशय आला होता. त्यानंतर पाहुण्यांनी या तरुणांशी बोलायला सुरुवात केली. तेथीलच ओशिवारा पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की जेव्हा पाहुण्यांच्या लक्षात आले की ही मुले बाहेरून जेवण करण्यासाठी आली आहेत. तेव्हा त्यांनी मुलांना मारहाण केली. कार्यक्रमाचे आयोजक कमालीचे संतापले होते. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे हे मुलांच्या लक्षात येतात मुलांनी हॉलमधून बाहेर पळ काढला.
रस्त्यावर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी आयोजकांना समजावून सांगून हा वाद मिटवला. त्या ठिकाणी उभे असलेल्या एका व्यक्तीला जावेदने आपली गाडी पार्किंग मधून बाहेर घेऊन येण्यास विनंती केली. गाडी आणण्यासाठी त्या व्यक्तीकडे जावेदने चावीदेखील दिली. परंतु त्या व्यक्तीने पार्किंग मध्ये जात गाडी चालू केली आणि तो व्यक्ती गाडी घेऊन फरार झाला. याबाबत जावेदने ओशिवारा पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास चालू आहे.
कुणाच्याही लग्नात जाऊन जेवण करावे का?
खरंतर वास्तविक पहायला गेले तर या कार्यक्रमांच्या हॉलच्या आजूबाजूला लोकवस्ती असते, अशा ठिकाणी आजूबाजूचे बरेच लोक त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी जात असतात. असे बरेच लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांची देखील कोंडी होते. कारण त्यांनी बोलवलेले पाहुणे राहतात बाजूलाच आणि इतरच लोक जेवण करून जातात. त्यामुळे बऱ्याच लग्नामध्ये पाहुण्यांचेच जेवणाचे हाल झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच आयोजकांवर बदनामीची टांगती तलवार असते.
हेही वाचा: Cow Vs Tiger Fight: अरे बापरे! दबक्या पावलाने गाईने केली वाघाची शिकार, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
Success Story: शाब्बास लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..
Job Opportunities: 88 हजार तरुणांना नोकरी; सरकारच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हीही करा लगेच अर्ज..
Ration Card: धान्य घेण्यासाठी आता रेशन कार्डची आवश्यकता नाही! फक्त करा हे काम..
Chanakya Niti: मार्ग कितीही खडतर असू द्या, फक्त चाणक्याचे हे शब्द ध्यानात ठेवा; यश लोटांगण घालेलच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.