Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..
Chanakya Niti: आपल्याकडे ही मोठी संपत्ती असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्येकाला हे शक्य होत नाही. अनेकदा अफाट कष्ट करून देखील यश मिळत नाही. तुम्ही वडीलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकलं असेल, हे करू नको ते करू नको, नाहीतर लक्ष्मी घरी येत नाही. काही प्रमाणात हे सत्य आहे. तुमच्या सवयींवर तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास आहे की नाही, हे ठरत असतं. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी देखील या संदर्भात सविस्तर भाष्य केला आहे.
आचार्य चाणक्य थोर विद्वान होते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आपला चाणक्य नीति (chanakaya niti) हा ग्रंथ लिहून ठेवला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी नातेसंबंध, व्यवहार, यासह अनेक दैनंदिन जीवनाशी निगडित असणाऱ्या विषयांवर भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्याची देखील गुपिते आपल्या चाणक्य नीति ग्रंथात नमूद केलेली आहेत. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
स्वयंपाकघरतील भांडी
आचार्य चाणक्य यांनी लक्ष्मी कोणत्या गोष्टीमुळे नाराज होते, यासंबंधी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. तुमच्या कृत्यामुळे जर लक्ष्मी नाराज होत असेल, तर तुम्ही अफाट कष्ट करून देखील तुम्हाला यश मिळणार नाही. धनाचा लाभ होणार नाही, असं आचार्य चाणक्य म्हणतात. जर तुमच्या किचनमध्ये खरकडी भांडी असतील तर लक्ष्मी घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही.
आचार्य चाणक्य सांगतात, संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर भांडी स्वच्छ धुवून ठेवणे आवश्यक असते. याबरोबरच गॅस देखील व्यवस्थित पुसून ठेवल्यास लक्ष्मीचा घरात वास होतो. जर तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर, खरकडी भांडी तसेच किचनमध्ये ठेवत असाल, तर तुम्ही गरिबीला निमंत्रण देता असं आचार्य चाणक्य म्हणतात.
खर्च
आचार्य चाणक्य म्हणतात, मनुष्याने जर अनावश्यक खर्च करायचं थांबवलं नाही, तर लक्ष्मी त्याच्याजवळ दीर्घकाळ राहत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, लक्ष्मी आयुष्यात येण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. आपट कष्ट करणे आवश्यक आहे. मात्र कष्टाबरोबरच लक्ष्मीचा सन्मान करणे देखील तितकेच आवश्यक असते. जर तुम्ही पैशाचा सन्मान केला नाही, आणि पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च केला तर लक्ष्मी तुमच्याजवळ फार काळ टिकत नाही.
अपमान
मनुष्याने आयुष्यात नेहमी नम्र असायला हवं, असं आचार्य चाणक्य म्हणतात. मनुष्य जर विनाकारण लोकांचा अपमान करत राहिला तर लक्ष्मी त्याच्याजवळ अजिबात थांबत नाही. वडीलधाऱ्या मंडळींचा त्याच बरोबर महिलांचा जो मनुष्य अपमान करतो, अशा लोकांवर लक्ष्मी नाराज राहते. आणि म्हणून अशा लोकांनी अफाट कष्ट केले तरी देखील त्यांना पाहिजे त्या प्रमाणात यश मिळत नाही.
हे देखील वाचा Wedding Viral video: या किरकोळ कारणासाठी नवरीने वाजवली नवरदेवाच्या कानाखाली; पुढे जे घडलं ते कल्पणे पलिकडचे..
Astrology Horoscope: आजपासून या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार..
Ileana DCruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywod च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..
Viral video: काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ! गुरांच्या कळपात वाघ शिरला अन्…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम