Jiocinema: अंबानींचा ग्राहकांना दणका! फ्री नंतर आता Jio Cinema पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे..
Jiocinema: आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धा आता रंगतदार अवस्थेत आली आहे. यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएल पाहण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागत होते. यापूर्वी आयपीएलच्या प्रेक्षपणाचे ओटीटी आणि टीव्ही असे दोन्ही राईट्स स्टार स्पोर्टने खरेदी केले होते. आयपीएल स्पर्धा OTT platform वर पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन करावं लागत होते. मात्र आता जिओ सिनेमाने OTT platform चे राईट्स विकत घेतल्यानंतर, क्रिकेट चाहत्यांना आयपीएल क्रिकेट स्पर्धा jio Cinema या OTT platform वर अगदी मोफत पाहता येत आहे.
मात्र जिओ सिनेमा या ओटीपी प्लॅटफॉर्मवर आयपीएल क्रिकेट स्पर्धा पाहणाऱ्यांसाठी आता दुखत बातमी असून, आता चार्ज आकारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आता jio Cinema या OTT platform वर चार्ज आकारणार आहे. या संदर्भातली माहिती रिलायन्स मीडिया आणि व्यवसाय अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी दिली आहे.
जियो सिनेमा रिलायन्स इंडस्ट्रीज मालकीच्या मालकीचा आहे. येणाऱ्या काळामध्ये या ओटीपी प्लॅटफॉर्मवर शंभरहून अधिक सिनेमे आणि अनेक टीव्ही मालिका जोडण्याचा मानस रिलायन्स इंडस्ट्रीचा आहे. Amazon, Netflix या सारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी जिओ सिनेमा पाऊले उचलत आहे. यासाठी जिओ सिनेमा घरा घरात पोहचवणे आवश्यक होते. आणि म्हणून आयपीएल स्पर्धा मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र आता यापुढे jio Cinema पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना चार्ज द्यावा लागणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवसायिक अध्यक्षा ज्योती देशपांडे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या, अर्थात जियो सिनेमाचा विस्तार झाल्यानंतर पैसे आकारण्यात येतील. किती चार्ज आकरायचा, हा निर्णय झाला नसला तरी लवकर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. आयपीएल स्पर्धा संपण्यापूर्वी नवीन टायटल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर चार्ज आकारला जाईल. तोपर्यंत क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचे सामने मोफत पाहता येणार आहेत. असं देखील त्या म्हणाल्या.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओनी एक वर्ष अनलिमिटेड कॉलिंग आणि डाटाची सुविधा ग्राहकांना दिली होती. जिओच्या या ऑफरमुळे ग्राहक आकर्षित झाले. आणि जिओचे विक्रमी ग्राहक बनले. टेलिकॉम क्षेत्रात यशस्वी पदार्पण केल्यानंतर, आता रिलायन्स इंडस्ट्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला आहे. जिओ सिनेमा घराघरात पोहोचण्यासाठी आयपीएल क्रिकेट स्पर्धा मोफत दाखवण्याचा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीने घेतला.
मात्र आता यापुढे ग्राहकांना जियो सिनेमा पाहण्यासाठी चार्ज आकारला जाणार आहे. हा चार्ज कधीपासून आकारला जाईल. हे अद्याप कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले नसले तरी लवकरच या संदर्भात मोठी घोषणा करणार असल्याचेही रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवसायिक अध्यक्षा ज्योती देशपांडे म्हणाल्या आहेत.
हे देखील वाचा How Should Men Urinate: या चुकीच्या पद्धतीने लघवी केल्यामुळेच होतोय मुतखडा; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..
Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? तर चिंता करू नका; दोन मिनिटात असं करा डाऊनलोड..
Second Hand Bike: नवी कोरी Hero HF Deluxe मिळतेय 25 हजारात, तर Hero passion Pro मिळतेय 30 हजारात..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम