Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..
Cotton Rate: शेतकऱ्यांचे (farmers life) आयुष्य सोपं नाही. शेतकऱ्यांना चहूबाजूंनी संकटाचा सामना करत शेती करावी लागते. आणि आपला उदरनिर्वाह करावा लागतो. अवकाळी पाऊस, गारपीट, खराब वातावरण अशा अनेक संकटातून वाट काढत त्याला आपलं पीक आणावे लागते. हे कमी की काय म्हणून, नंतर शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. इतर शेतकऱ्यांबरोबरच कापूस उत्पादक शेतकरी देखील गेल्या काही महिन्यांपासून संकटात होता. मात्र आता त्याला चांगले दिवस आले आहेत. (Cotton farmer big news)
गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर प्रचंड कमी झाल्याने शेतकरी चिंतेत होता. शेतकरी हवालदिल झाला असताना देखील सरकारने त्यांच्याकडे बिलकुल ही लक्ष दिलं नाही. इतर शेतकऱ्यांप्रमाणेच यावर्षी देखील कापूस उत्पादक शेतकर्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस, गारपीट, यासारख्या संकटातून सावरून त्याने कापसाचे उत्पन्न घेतलं. मात्र कापसाला गेल्या तीन महिन्यांपासून दर नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळाले.
गेल्या तीन महिन्याच्या तुलनेत कापसाचे दर आता चांगले वाढले आहेत. दर वाढतील, या आशेवर बसणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. मात्र येणाऱ्या काही दिवसांत दर आणखी वाढेल, याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या हातून खूप काही गमवावे लागू शकते. अनेक संकटाचा सामना करून शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून कापूस आपल्या घरामध्ये चार पैसे अधिक येतील, या आशेने ठेवला होता. कापसावर असणारे किडे घरातल्या लहान-मोठ्या सदस्यांना चावतात. सगळ्या गोष्टी सहन करत त्याने आपला कापूस जपून ठेवला. याचे चीज आता होणार आहे.
जास्त वाट पाहू नका
गेल्या काही महिन्याच्या तुलनेत कापसाला चांगला भाव आला आहे. आणखी दरवाढीची अपेक्षा न करता शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणं आहे. कापूस सांभाळणं खूप अवघड असतं. त्यातच आता उष्णता वाढत चालली असल्याने, कापसाचे वजन देखील कमी होत जाणार आहे. आणखी दोन महिन्यांनी पावसाला देखील सुरुवात होणार असल्याने, कापूस भिजण्याची देखील शक्यता असते. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपला कापूस आणखी काही महिने व्यवस्थित संभाळणं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
दोन महिन्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार असल्याने, कापूस सांभाळून अवघड आहे. शिवाय शेतीची कामे देखील रखडून पडल्याचे चित्र आहे. यावेळी पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करणे आवश्यक आहे. कापूस विक्रीतून आलेल्या पैसा मधूनच शेतीची मशागत करावी लागत असल्याची परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची असते. या सगळ्या गोष्टीचा विचार केला, तर कापसाला चांगला तर आला आहे. तोवरच शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे हाच योग्य पर्याय आहे.
आज राज्यात कापसाला चांगला भाव
गेला काही महिन्याच्या तुलनेत कापसाची मागणी आता वाढली आहे. आवक देखील कमी झाली असल्याने, राज्यात अनेक ठिकाणी कापसाला चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी आणखी दराची अपेक्षा केली, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकतं. नागपूर जिल्ह्यामधील उमरेड या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. तब्बल 1,130 क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद झाली. त्याचबरोबर वर्धा वर्ध्यामध्ये कापसाला 11 एप्रिल म्हणजे, आज सर्वाधिक भाव मिळाला आहे. तब्बल आठ हजार तीनशे रुपये क्विंटल प्रमाणे कापसाला भाव मिळाला आहे.
सर्वाधिक आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला असून, कापसाच्या दराची सरासरी सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अशी आहे. भद्रावती, उमरेड, पारशिवनी, किनवट, काटोल, वरोरा-माढेली या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी तब्बल आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव सुरू आहे. अशात शेतकऱ्यांना आपल्या घरातील कापूस विक्रीसाठी काढणे हाच योग्य उपाय आहे. आणखी भाव वाढीच्या अपेक्षा केली तर शेतकऱ्याना आपल्या हातून खूप काही गमवावे लागेल.
CSK vs RR: या सिझनचे दोन सर्वात तगडे संघ एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कोण मारणार बाजी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम