Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या ‘चार’ गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..
Dream11 Prediction: सध्या आयपीएलचा (ipl) रणसंग्राम सुरू आहे. फक्त भारतातच नाही, तर जगभरात आयपीएल स्पर्धा कमालीची चर्चेत असते. भारतात तर आयपीएलला फेस्टिवल पेक्षाही अधिक महत्व प्राप्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा (international cricket) भारतीय खेळाडू आयपीएलला अधिक महत्त्व देतात, हे आता लपून राहिलेलं नाही. अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून जितका पैसा मिळत नाही, तितका पैसा दोन महिन्यात खेळाडूंना मिळतो. आयपीएलमुळे फक्त खेळाडूच मालामाल होत नाहीत, तर इतरही अनेकजण आयपीएलवरच्या जीवावर लाखो रुपये कमवतात. (Dream 11 prediction)
आयपीएल सुरू झाल्यानंतर क्रिकेट प्रेमी आपल्या संघाला सपोर्ट करताना दिसून येतात. ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून आता अनेकांना आपली आवडती टीम सिलेक्ट करता येत आहे. सिलेक्ट केलेल्या टीमला जर सर्वाधिक पॉईंट मिळाले, म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेल्या टीम मधील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आता क्रिकेट प्रेमींना मिळाली आहे.
जर तुम्ही देखील ड्रीम इलेव्हनवर आपली टीम सिलेक्ट करून, खेळत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. झटपट श्रीमंत होणे कोणाला आवडत नाही. आजकाल प्रत्येकाला लगेच श्रीमंत व्हायचं असतं. मात्र श्रीमंत होण्यासाठी तुमचं स्मार्टवर्क देखील त्याच पद्धतीने असायला हवं. ड्रीम इलेव्हनवर तुम्ही तुमची टीम सिलेक्ट करताय, मात्र तुम्हाला अजून पर्यंत यश मिळालं नाही. किंवा फारसे पॉईंट मिळवता येत नसतील, तर तुम्ही या चार गोष्टीचा विचार करून टीम सिलेक्ट करा.
पिच रिपोर्ट
ड्रीम इलेव्हनवर टीम बनवताना अनेक जण आपल्या आवडीचे खेळाडू घेत असतात. मात्र प्रोफेशनमध्ये प्रेमाला फारसं महत्त्व नाही. आपण ज्या खेळाडूंवर प्रेम करतो, त्यांना आपल्या टीममध्ये सिलेक्ट करून तुम्ही मोठी चूक करता. प्रोफेशनमध्ये रणनीतीला महत्त्व आहे. म्हणून टीम बनवताना सर्वप्रथम तुम्ही पीच रिपोर्ट काय आहे? हे पाहणं आवश्यक असतं. एखाद्या मैदानावर जर गोलंदाजांना खेळपट्टी साथ देत असेल, आणि तुम्ही फलंदाजाला कॅप्टन किंवा उपकर्णधार निवडून उपयोग नाही.
मैदानावर संघाची कामगिरी
कोणत्या मैदानावर कोणत्या संघाची कामगिरी दमदार आहे. याचा देखील विचार तुम्ही टीम निवडताना करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ चिन्हस्वामी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. या मैदानावर खेळपट्टी देखील फलंदाजीला अनुकूल आहे. अशावेळी तुम्ही रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या फलंदाजांना आपल्या संघात घेणे जरुरीचे आहे. बरोबर दोन्ही संघातील फलंदाजांनाच तुम्ही कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून निवडणे गरजेचे आहे.
धावांचा पाठलाग करताना कामगिरी
एखादा संघ धावांचा पाठलाग करताना उत्कृष्ट कामगिरी करतो. तर एखादा खराब कामगिरी करतो. अशावेळी तुम्ही कोणता संघ धावांचा पाठलाग करताना उत्कृष्ट खेळ करत आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे. जो संघ गावांचा यशस्वीरित्या पाठलाग करतो, अशा संघाच्या फलंदाजांना तुम्ही कर्णधार किंवा आणि उपकर्णधार म्हणून निवडणे आवश्यक असते. धावांचा पाठलाग करताना एखाद्या संघाची उत्कृष्ट कामगिरी राहील नसेल, तर अशा संघातील फलंदाजांना निवडणे आणि कर्णधार करणे हे योग्य होणार नाही. अशावेळी तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाला कर्णधार म्हणून निवडू शकता.
खेळाडूंचा फॉर्म आणि रेकॉर्ड
जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूला आपल्या टीममध्ये स्थान देत, तेव्हा त्या खेळाडूंचा फॉर्म कसा आहे? त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे? याचा देखील विचार टीम बनवताना करणे गरजेचे असते. अनेकदा एखादा खेळाडू स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असतो. मात्र एका ठराविक संघाविरुद्ध त्याची कामगिरी खूपच सामान्य राहिलेली असते. अशावेळी त्या खेळाडूला तुम्ही टीममध्ये ठेवू शकता. मात्र कर्णधार म्हणून निवडताना विचार करणे गरजेचे असते.
हे देखील वाचा Free Silai Machine Yojana: महिलांना मिळतेय मोफत शिलाई मशीन; या पध्दतीने करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम