Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..
Bajaj electric scooter: सध्या भारतात इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे देशातील लोक आता इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर जास्त भर देत आहेत. प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार इलेट्रीक वाहन खरेदीला मोठी चालना देत आहे. तसेच लोकही मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहेत. यासाठी सरकार कडून सबसिडी ही देण्यात येत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कमी किमतीत मिळत आहे. ग्राहकांना ही बजेटमध्ये वाहन खरेदी करता येत आहे. त्यामुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त असल्याचं मागील काही दिवसात दिसत आहे. ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. सध्या देशात ओला इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये टॉपला असली तरी आणखी काही वाहने ही जोरदार टक्कर देत आहेत.
पेट्रोलने शंभरी ओलांडून बरेच दिवस झाले. ग्राहकांना पेट्रोल भरायला देखील परवडत नाही. त्यात आता इलेक्ट्रिक स्कुटरही चर्चेत आल्या असून, लोकांची डिमांड ही वाढत आहे. एवढच नाही, तर आपल्याला इलेक्ट्रिक स्कुटर आपल्या बजेटमध्ये मिळत आहे. बजाज कंपनीने “हमारा बजाज” म्हणत अनेक वर्ष दुचाकी आणि चारचाकीमध्ये आपला अनुभव पणाला लावला आहे. आता सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकलला चालना दिल्यानंतर बजाज आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही दमदार मुसंडी मारताना दिसत आहे.
आता बजाजची बजाज चेतक नावाची स्कुटर ही जोराची टक्कर देत आहे. तुम्ही सध्या जर इलेक्ट्रिक स्कुटर सर्च करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला बजाज चेतक या भन्नाट स्कुटर बाबत माहिती देणार आहोत. ही स्कुटर किती रुपयांत मिळते? फायनान्स प्लॅन काय, हप्ते किती असणार, EMI किती असणार आणि स्कुटर बाबत सगळी माहिती आपण जाणून घेऊ.
बजाज चेतक (Chetak Smart Electric Scooter) ही स्कूटर तुम्हाला आता अवघ्या 15 हजारात मिळणार आहे. त्यात बेस्ट फीचर आणि लुकही तुम्हाला आवडेल असाच आहे. सध्या तुम्ही स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर, ही स्कूटर तुम्हाला खूप फायद्यात राहील. भारतीय बजाज चेतकची किंमत 1,51,958 आहे. तिच्यासाठी तुम्हाला 1,57,943 रुपये लागतात. मात्र तुम्ही डाऊन पेमेंटवर ही स्कूटर खरेदी करू शकता. यासाठी कोणता फायनान्स प्लॅन आहे? ते पाहूया
तुम्ही केवळ 15 हजार रुपयांमध्ये ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता. बँक तुम्हाला या स्कूटरवर 1,42,943 रुपयांचे कर्ज देते. या कर्जावर तुमच्याकडून 9.7 इतके वार्षिक व्याज आकारले जाईल. 15 हजार डाऊन पेमेंट भरून तुम्ही ही स्कूटर घेऊ शकता. याचा महिन्याला 4 हजार 592 इतका EMI भरावा लागेल. हे कर्ज तुम्ही 3 वर्षात फेडू शकता. या स्कूटरचा 63 किमी प्रतीतास एवढा वेग आहे.
बजाज चेतक 50.4V,60.4Ah लिथियम आयन बॅटरी पॅक आणि 4080 W BLDC मोटरसह येते. या बॅटरी पॅकवर कंपनी ग्राहकांना 3 वर्षांची वॉरंटी देते. ही स्कूटर एकदा चार्ज केली तर 95 किमी पर्यंत चालू शकते. त्यामुळे सगळ्याच बाबतीत परवडेबल अशी ही बजाज चेतक स्कुटर आहे. विशेष म्हणजे, ही बाईक एका तासात तब्बल 63 किलोमीटरचा प्रवास पार करते.
हे देखील वाचा Poco Smartphone: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..
OnePlus: OnePlus चा तगडा स्मार्टफोन मिळतोय केवळ 13,500 रुपयांत; जाणून घ्या डिटेल्स..
Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम