Instagram followers: या पद्धतीने इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवा, अन् महिन्याला कमवा लाखो रुपये..
Instagram followers: सध्या सोशल मीडिया सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. सोशल मीडियाच्या वापरापासून दूर असणारे असे मोजकेच काही लोक आपल्याला दिसतील. बाकी सगळ्यांना सोशल मीडियाचे वेड आहे. यावर प्रत्येकवेळी आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळते. सध्या अनेक लोक तर Instagram Facebook YouTube या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून आपले करिअर घडवताना दिसत पाहायला मिळतात. अनेक लोक इन्स्टाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवतात. इन्स्टाग्राम स्टार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अनेकजणांनी याकडे आपले प्रोफेशनल करिअर म्हणून देखील पाहिले आहे.
इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. हे देखील खरं असलं, तरी त्यासाठी तुमच्याकडे फॉलोवर देखील असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला पैसे कमावता येणार आहेत. आज आपण इंस्टाग्रामवर फॉलोवर्स कसे वाढवायचे? या संदर्भात जाणून घेणार आहोत.
इन्स्टाग्रामचे व्ह्यूज आणि कमेंट हे प्रत्येक व्हिडीओसाठी खूप महत्वाचे असते. यूजर्सनी केलेल्या कमेंट्सद्वारे त्यांना आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटकडे आकर्षित करता येऊ शकते. हे करण्यासाठी पिन हा चांगला ऑप्शन आहे. याद्वारे आपण एखादी चांगली कमेंट पिन करुन त्या माध्यमातून व्ह्यूज आणि सोशल मीडिया एन्गेजमेंटसाठी त्याचा फायदा करून घेऊ शकतो.
इन्स्टाग्रामच्या पोस्टमधील कमेंट पिन करण्यासाठी आपण काही टिप्स वापरू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा तुमचे इन्स्टा ओपन करा, आणि आपल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करून कमेंट बॉक्स उघडा. त्यांनतर तुम्हाला जी चांगली कमेंट वाटेल, त्या कमेंटवर काही वेळ क्लिक करून ठेवा. असे केल्याने तिथे पिन नावाचा ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर जर तुम्ही क्लिक केले, तर कमेंट सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळेल. तुम्ही हे आयफोनमध्ये करत असाल, तर कमेंट पिन करण्यासाठी राईट स्वाइपच्या ऑप्शनची मदत घ्यायची आहे. ही अतिशय सोपी पध्द्त आहे. यामुळे देखील आपले फॉलोवर्स वाढायला मदत होईल.
आता आपण इन्स्टाग्राम रिलमधील कमेंट पिन करण्यासाठी काय करायचे, त्याबाबत माहिती घेऊ. सेम प्रोसेस आहे, आपण पोस्ट पिन करण्यासाठी ज्याप्रमाणे प्रोसेस केली, तसच रिलबाबत देखील करायचं आहे. सुरुवातीला इन्स्टा ओपन करा. प्रोफाइलवर जा, रिल सेक्शनमधील निवडलेल्या रिलवर जाऊन कमेंट्स ऑप्शनवर क्लिक करा. ज्या प्रमाणे पोस्टच्या पिन साठी केलं, त्याच पद्धतीने कमेंट पिन करायची आहे. रिल्सवर क्लिक करून काही वेळ थांबा. असे केल्याने आपली कमेंट पिन झालेली असेल. आयफोनमध्ये जर रील कमेंट पिन करायची असेल, तर क्लिक करण्याऐवजी कमेंट स्वाईप करा. अशा प्रकारे आपण कोणत्याही रिलवर तीन कमेंट पिन करू शकता.
आता आपण इन्स्टावर जे लाईव्ह केले जाते, त्याची कमेंट कशी पिन करायची याबाबत माहिती घेऊ. सुरुवातीला इन्स्टा सुरु करा. त्यात तुम्हाला create + हे ऑप्शन दिसेल. आयफोनवर करत असाल, तर हे ऑप्शन वर दिसेल. create + वर क्लिक केल्यावर आपली मोबाईल गॅलरी ओपन होईल. गॅलरीच्या ऑप्शनवरुन लाइव्हच्या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला बाजूला टायटल दिसेल. यामध्ये लाइव्हबद्दल थोडक्यात लिहून त्याची माहिती ही देऊ शकता. तुम्ही जर लाइव्हवर क्लिक केलं, तर लाइव्ह सुरु होईल. त्यावर कमेंट यायला लागतील. आता आपल्याला या कमेेंट पिन करायच्या असतील, तर इथे आपण आपली स्वतःची कमेंट देखील पिन करू शकता. त्यासाठी निवडलेल्या कमेेंटवर काही वेळ क्लिक करून ठेवा. पिन दिसल्यावर त्याच्यावर क्लिक करा. लगेच कमेंट पिन होईल. तुम्ही कमेंट अनपिन देखील करू शकता. अशा प्रकारे आपण इन्स्टावर फॉलोवर्स वाढवून आपले करिअर घडवू शकतो.
हे देखील वाचा Poco Smartphone: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..
Tips For Married Couple: पती पत्नीच्या नात्यात कायम ओलावा ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स..
Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम