Mahashivratri 2023: ..म्हणून महादेवाचे बेलपत्रावर आहे विशेष प्रेम; शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचे महत्व जाणून व्हाल चकित..

0

Mahashivratri 2023: उद्या म्हणजेच शनिवार १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. देशभरात उद्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्रीला अनेक ठिकाणी यात्रा देखील भरतात. एकादशी उपवास आणि शंकराच्या पिंडाची पूजा करून, शिवलिंगावर बेलपत्र वाहून शिवजींची आराधना केली जाते.

महाशिवरात्रीच्या दिवशी देवाधिदेव महादेवाची विधीनुसार पूजा केली जाते, आणि शिवभक्त शिव मंदिरात शिवलिंगावर जलाभिषेक करतात. भगवान शंकराची खऱ्या मनाने पूजा केल्यास सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी भांग, धतुरा, बेलपत्र दुर्वा यांच्यासह पवित्र नदीचे पाणी अर्पण केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का भगवान शंकरांना बेलपत्र का आवडते? आणि त्यांच्या शिवलिंगावर बेलपत्र का अर्पण केले जाते?

खरे तर सहस्त्र पुराणानुसार जेव्हा समुद्रमंथन चालू होते, तेव्हा त्यातून हलहल विष बाहेर पडले. ज्यामुळे संपूर्ण विश्वाचा विनाश होत होता. ज्याला पाहून सर्व देवी-देवता, प्राणी आणि गंधर्व सर्व त्रस्त होऊ लागले. मग सर्वांनी मिळून भगवान भोलेनाथाची आराधना सुरू केली. तिन्ही लोकात गोंधळ माजला. सर्वांची प्रार्थना स्वीकारून भोलेनाथांनी हलाहल आपल्या गळ्यात घेतला. भगवान भोलेनाथांनी विष घेतले. पण हलाहलच्या तीव्रतेमुळे भोलेनाथांच्या मेंदूची उष्णता वाढू लागली. शांत होण्यासाठी देवतांनी पवित्र नद्यांचे पाणी आणि बेलपत्र महादेवाला अर्पण केले.

तेव्हापासून भगवान शंकराला पवित्र जल आणि बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. दुसरीकडे, आणखी एक धार्मिक मान्यता आहे. तीव्र तपश्चर्येनंतरही माता पार्वती भोलेनाथला प्रसन्न करू शकली नाही. तेव्हा तिने एका बेलपत्रावर रामाचे नाव लिहून भगवान शंकरांना अर्पण केले. त्यानंतर त्यांनी प्रसन्न होऊन माता पार्वतींशी विवाह केला.

त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने देवाधिदेव महादेव खूप प्रसन्न होतात. बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा करणे अशुभ मानले जाते. महाशिवरात्रीला शिवभक्त मोठ्या श्रद्धेने भगवान शंकराची पूजा करतात.  महाशिवरात्रीच्या उपासना पद्धतीमध्ये बेलपत्राचा वापर केला जातो. बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. शिवपूजेत बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवलिंगावर अर्पण केले जाते. शिवाची पूजा बेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही असे मानले जाते.

अशी झाली बेलपत्राची उत्पत्ती 

ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवाला प्रिय वस्तू अर्पण केल्या जातात. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेलपत्र. पौराणिक कथेनुसार, एकदा देवी पार्वतीच्या कपाळातून घाम निघाला आणि तो पर्वतावर पडला. त्याच्यापासून बिल्लू नावाचे झाड झाले. सर्व पवित्र स्थाने बेलपत्राच्या देठात आणि देवी पार्वती पानांमध्ये वास करते. त्यामुळे भगवान शिवाला बेलपत्रावर खूप प्रेम आहे. बेलपत्र अर्पण करताना काळजी घ्यावी. तीन पानासह बेलपत्र अर्पण करावे.

हे देखील वाचा Sara Tendulkar: शुभमन गिल नाही, हा आहे सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड; नाव जाणून व्हाल चकित..

Vastu Tips: घरामध्ये चुकूनही या 3 वस्तू आणू नका, अन्यथा रस्त्यावर याल..

Relationship Tips: ती हे इशारे करत असेल तर समजून जा तुमच्या प्रेमात झालीय पागल..

pregnancy tips: गर्भधारणेसाठी महिलांचे योग्य वय त्वरित जाणून घ्या, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम..

Samsung galaxy S22: सॅमसंगची विशेष ऑफर, २७ हजारात खरेदी करा ८६ हजाराचा हा स्मार्टफोन..

Valentine: यंदा व्हॅलेंटाईनला गुलाब नाही, या वस्तुची झाली रेकॉर्डब्रेक विक्री; जाणून तुम्हीही व्हाल हैराण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.