Onion Rate: आवक घटल्यामुळे कांद्याने गाठला उच्चांक; ‘या’ महिन्यानंतर कांदा होणार 80 रुपये किलो..

0

Onion Rate: खरिपातील (kharif) कांद्याचे (Onion) तब्बल 40% हून अधिक नुकसान झाल्यामुळे, यावर्षी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. (Inflows decreased significantly) जून जुलै मध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने, दरवर्षीप्रमाणे कांदा लागवड झाली नाही. खरीप कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्र (Maharashtra) त्याचबरोबर कर्नाटक (karnatka) आणि आंद्रप्रदेश (Andra Pradesh) ही राज्य आग्रेसर आहेत. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये जून महिन्यात कांदा लागवड (Onion planting) करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस (rain) झाला नाही. आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांदा लागवडीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Onion cultivation suffered huge losses)

दरवर्षीच्या तुलनेत कर्नाटकमध्ये यावर्षी खरीप कांदा लागवड तब्बल 14% कमी झाली. तर महाराष्ट्रामध्ये खरीप लागवड यावर्षी तब्बल ११ टक्क्यांनी घटल्याचं जाणकार सांगतात. त्याचबरोबर आंध्रप्रदेश मध्ये खरीप लागवड तब्बल १९ टक्क्यांनी खटली आहे. याचा परिणाम थेट कांद्याच्या दरावर (Onion rate) होणार असून, कांद्याचा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा (Onion shortage) देखील निर्माण होणार असल्याचं जाणकारांनी सांगितले आहे.

जगभरात भारताच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. चवीला चांगला आणि रंगाला देखील भारताचा कांदा लाल असल्याने, या कांद्याला मागणी असते. मात्र केंद्र सरकारच्या (central government) धोरणामुळे निर्यातीचे गणित पूर्णपणे कोलमडलं. 2019/20 या वर्षांमध्ये कांद्याचे दर देशांर्गत वाढल्याने, केंद्र सरकारने विदेशात निर्यात होणारा कांदा काही महिने थांबवल्याने भारत निर्यातीच्या बाबतीत बेभरवशी असल्याने अनेक देशांनी इतर देशांकडून कांदा आयात करायला सुरुवात केली. साहजिकच यामुळे भारताच्या कांद्याची निर्यात खूप मोठ्या प्रमाणात थांबली गेली.

भारताचा कांदा आयात करणाऱ्या अनेक देशांनी कांद्या खरेदीसाठी इतर देशाचा पर्याय निवडला असला तरी देखील यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात कांद्याच्या उत्पन्नात घट झाली असल्याने, कांदा विक्रम करणार असल्याचा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याने, डिसेंबरमध्ये दाखल होणारा कांदा दोन ते तीन महिने उशिरा दाखल होणार असल्याचे चित्र आहे. फक्त शेतामध्ये असणारा कांदाच नाही, तर व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा देखील खराब वातावरणामुळे खराब झाला आहे. साहजिकच यामुळे बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात घटली आहे.

बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने, कांद्याचे दर आता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. लाल कांद्याच्या हंगामाला आता उशीरा सुरुवात होणार असल्याने, मागणीनुसार कांदा बाजारात येत नाही. त्याचबरोबर आणखी अडीच ते तीन महिने बाजारात अशीच परीस्थिती असणार आहे. साहजिक कांदा निर्यात होणार नसला तरी देखील, कांदा अडीच ते तीन महिने तेजीत राहणार असल्याचं चित्र आहे. अवकाळी पावसामुळे खराब झालेला कांदा देखील बाजारात काही प्रमाणात दाखल होत आहे. मात्र या कांद्याला मागणी खूप कमी आहे.

महिनाभरात कांदा करणार विक्रम

अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम वाहून गेला. यामुळे डिसेंबरमध्ये दाखल होणारा कांदा यावर्षी तीन अडीच ते तीन महिने उशिरा दाखल होणार आहे. साहजिकच या काळात आवक मोठ्या प्रमाणात घटणार आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे अडीच ते तीन महिने कांदा तेजीत राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या काळामध्ये कांदा नक्की किती वाढेल? हे ठोसपणे सांगता येत नसलं, तरी कांदा 70 ते 80 रुपये किलोवर जाऊ शकतो. असं देखील जानकार सांगतात. अवकाळी पावसामुळे दरवर्षी कांद्याचे नुकसान होणार याचा अंदाज व्यापाऱ्यांना देखील असतो. मात्र यावर्षी साठवून ठेवलेल्या कांद्याचे देखील खराब वातावरणामुळे नुकसान झाल्याने, दुहेरी संकट निर्माण झाले आहे. याचा फटका आता ग्राहकांना सोसावा लागणार आहे.

एका आठवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ

अवकाळी पावसामुळे खरीप हंगामा कांदा तब्बल ९० टक्के खराब झाला. खी प्रमाणात लाल कांदा दाखल होत असला तरी देखील बाजारात दाखल होत असणारा कांदा पुरेसा नाही शिवाय चांगल्या प्रतीचा देखील नाही. चांगल्या प्रतीचा कांदा फक्त 20 टक्के बाजारात येत आहे. तर उर्वरित 80 टक्के हा कांदा हलक्या प्रतीचा असल्याने कांद्याचे भाव पाहिजे तेवढ्या प्रमाणात वाढले नाहीत. असं असताना देखील गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात पाच ते सात रुपयांनी दिवसेंदिवस वाढ झाल्याचे पाहायला मिळते. बाजारामध्ये एक नंबर कांदा हा ४४ रुपयापर्यंत विकला गेला आहे. तर हलक्या प्रतीचा कांदा 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे देखील विकला आहे.

कांदा खरचं शंभरी पार करणार? 

अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे देशभरातील अनेक राज्यामधला कांदा खूप मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंद्राप्रदेश या तीन राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतलं जातं. मात्र खरीप हंगामामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मधील कांद्याचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरवर्षी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसतो. मात्र यावर्षी शेतीत असणाऱ्या कांद्याबरोबरच शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात व्यापाऱ्यांचा देखील समावेश आहे. कांद्याच्या दरामध्ये नक्की किती वाढ होईल हे ठोसपणे सांगता येत नसले तरी देखील कांदा ७० ते ८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

हे देखील वाचा PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Intelligence Bureau Recruitment: १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी बंपर भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.